Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे दोन शिक्षकांनी १७ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पालकांनी तक्रार केल्यानंतर फरार होणाऱ्या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली.
चंद्रपूर जिल्ह्यात या पंधरा दिवसात अल्पवयीन मुली, महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना सातत्याने पुढे आल्यात. या घटनांनी एकीकडे समाजमन सुन्न झालेले असतानाच जिल्ह्यात महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्नही आता गंभीर झालेला आहे.
Chandrapur Crime News: महाराष्ट्र हादरला! गतिमंद महिलेवर सामुहिक बलात्कार, बसस्थानकातील प्रसाधनगृहात अत्याचार; व्हिडिओ केला व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार,चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील नामांकित महाविद्यालयात दोन शिक्षकांनी सतरा वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना पुढे आली.पीडित विद्यार्थिनी बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. आपल्या वाढदिवसाचे निमित्त करून या विद्यार्थिनीला शिक्षकांनी आपल्या रूमवर बोलावले. वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून या आरोपी शिक्षकांनी तिच्याकडे मिठी मारण्याची मागणी केली.या मागणीने विद्यार्थिनी घाबरली.तिने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शिक्षकांनी बळजबरी केली. विद्यार्थिनीने कसेबसे स्वताची सुटका केली.पीडित मुलीने पालकांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
महाराजांनी भ्रष्टाचार, निष्काळजीपणाला माफी दिली नाही; मोदीजी, प्रायश्चित अटळ आहे- शरद पवारांच्या जवळच्या व्यक्तीची टीका
पालकांनी वरोरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पोलिसांनी पोस्को, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी शिक्षक फरार होण्यासाठी रेल्वे स्थानकात गेले. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही शिक्षकांना अटक केली.ही कार्यवाही पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचा मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार,विनोद जांभळे यांनी केली. आरोपींना वरोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या घटनेची माहिती होताच वरोरा शहरातील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष या घटनेनंतर आक्रमक झाले आहेत.त्यानी शिक्षकांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मनसे , भाजप, बजरंग दल या पक्ष – संघटनांनी घटनेविरोधात आंदोलन करून आरोपी शिक्षकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. तर ३१ ऑगस्ट रोजी वरोरा बंदची हाक देण्यात आली आहे.