Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
MH Election 2024 : मागील काही दिवसांपासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे अपक्ष लढणार अशी चर्चा सुरू होती. तशी बॅनरबाजी देखील इंदापुरात झाली. त्यात आता तुतारीची घोषणा होत असल्याने हर्षवर्धन पाटील तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार का? हे पाहावे लागणार आहे.
मागील काही दिवसांपासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे अपक्ष लढणार अशी चर्चा सुरू होती. तशी बॅनरबाजी देखील इंदापुरात झाली. त्यात आता तुतारीची घोषणा होत असल्याने हर्षवर्धन पाटील तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार का? हे पाहावे लागणार आहे.
‘यात्रा आली की जत्रा आली’ माहित नाही
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ” लोकसभेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शब्द दिला होता की विधानसभा निवडणुकीवेळी इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. मात्र आठ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी ‘यात्रा आली की जत्रा आली’ माहित नाही.? ती आल्यानंतर तेथे ते (उपमुख्यमंत्री अजित पवार) यांनी अप्रत्यक्षपणे. दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. हा अधिकार त्यांना कोणी दिला हा महायुती मधला धर्म आहे का.? अजून जागा वाटप व्हायचे आहे. कोणती जागा कुणाला मिळणार याबाबत चर्चा व्हायची आहे. हा अधिकार महायुतीतील एका पक्षाला कोणी दिला?”. असा सवाल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे.
Cyclone Asna Alert: अरबी समुद्रात ‘असना’ चक्रीवादळाचा अंदाज; ऑगस्टमधील गेल्या १३२ वर्षांमधील चौथी घटना, या भागांत अलर्ट
फडणवीस यांच्याशी माझे चांगले संबंध
भाजपाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे चांगले मित्र आहेत माझे आणि त्यांचे व्यक्तिगत चांगले संबंध आहेत. मी त्यांना भेटून चर्चा करणार आहे. असे पाटील म्हणाले.
अपमान सहन करणार नाही
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधील अनेक नेते महाविकास आघाडी आणि शरद पवार गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच असे म्हटले होते की, ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे. पक्ष कोणाला अडवणार नाही. त्यांनी जर विचार केला असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाही. मात्र, थोडा संयम ठेवला तर पक्ष काहीतरी निर्णय घेईल, यावेळी समरजीत घाटगे व हर्षवर्धन पाटील पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. हाच धागा पकडत हर्षवर्धन पाटील म्हणाले की, आम्ही कोणतीही चुकीची भूमिका घेतलेली नसताना कोणत्या दृष्टिकोनातून बावनकुळे साहेबांनी वक्तव्य केलं मला माहित नाही. तुम्ही अशी भूमिका घेत असाल तर. इंदापूरच्या सामान्य जनतेच्या भावना दुखावण्याचा अधिकार तुम्हाला कोणीही दिलेला नाही. पुढे जो निर्णय होईल तो होईल. मात्र मी तुम्हाला अभिमानाने सांगतो. हर्षवर्धन पाटील आयुष्यभर सर्व काही सहन करेल मात्र अपमान सहन करणार नाही. स्वाभिमानानेच पुढील काळात आपणाला काम करायचे आहे असा सूचक इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिला.