Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मध्य रेल्वेकडून ‘दिवाळीचं प्रीगिफ्ट’; नागपूर-पुणे मार्गावर धावणार विशेष ट्रेन, दानापूरचीही सफर होणार सुकर
Pune-Nagpur-Danapur Train: दिवाळीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नागपूर पुणे नागपूर आणि पुणे-दानापूर दिवाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. २५ ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेने नागपूर ते पुणे या मार्गावर २८ ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर दरम्यान द्विसाप्ताहिक एसी सुपर फास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी सायंकाळी सात वाजून ४० मिनिटांनी नागपूरहून सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. दुसरी गाडी पुण्याहून मंगळवार आणि शुक्रवारी २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत दुपारी तीन वाजून ५० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, नगर, दौंड चोर मार्ग आणि उरुळी असे थांबे असतील. या गाड्यांचे बुकींग सहा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
Pune News: पुण्यातल्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; विशेष रेल्वेगाड्यांच्या कालावधीत वाढ, ‘या’ गाड्यांचा समावेश
‘पुणे-दानापूर-पुणे’च्या २८ फेऱ्या
गाडी क्रमांक ०१४८१ पुणे-दानापूर विशेष २५ ऑक्टोंबर ते सात नोव्हेंबर दरम्यान पुण्याहून रात्री सात वाजून ५५ मिनिटांनी सुटेल. ती तिसऱ्या दिवशी दानापूरला पहाटे साडेचार वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण १४ फेऱ्या असणार आहेत. गाडी क्रमांक ०१४८२ दानापूर-पुणे विशेष २५ ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर दरम्यान दानापूरहून सकाळी साडेसहा वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजून ३५ मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. या गाडीच्या १४ फेऱ्या असणार आहेत. या गाडीला दौंड मार्ग लाइन, नगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, दीनदयाल उपाध्याय, बक्सर आणि आरा असे थांबे असणार आहेत. या गाड्यांचे बुकिंग सहा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.