Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121
Stree 2 ने कमाईत ॲनिमल आणि गदर २ लाही टाकलं मागे, १६ व्या दिवशी सिनेमाने किती कमावले? - TEJPOLICETIMES
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Stree 2 ने कमाईत ॲनिमल आणि गदर २ लाही टाकलं मागे, १६ व्या दिवशी सिनेमाने किती कमावले?

17

Stree 2 Box Office : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या ‘स्त्री २’ने तिसऱ्या वीकेंडलाही धुमाकूळ घातला आहे. तिसऱ्या शुक्रवारी या चित्रपटाने कमाईत ‘ॲनिमल’ आणि ‘गदर २’लाही मागे टाकले आहे.

हायलाइट्स:

  • ‘स्त्री २’ ने १६व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली
  • ‘स्त्री २’ने ‘ॲनिमल’ आणि ‘गदर २’ला मागे टाकले
  • चित्रपटाने देशात ५०० कोटींचा गल्ला गाठला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई– बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री २’ ची दमदार घोडदौड सुरूच आहे. थिएटरमध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या स्त्री २ ने तिसऱ्या शुक्रवारीही धमाका केला आहे. रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ आणि सनी देओलच्या ‘गदर २’लाही त्याने पराभूत केले आहे. या दोन्ही चित्रपटांनी तिसऱ्या शुक्रवारी ७.७५ कोटी आणि ७.१० कोटी रुपयांची कमाई केली होती. तर ‘स्त्री २’ त्यांच्यापेक्षा खूप पुढे आहे. या चित्रपटाने १६ दिवसांत देशभरात ३३१.३० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री २’ ने दुसऱ्या आठवड्यात प्रभासच्या ‘बाहुबली २’ (१३३.२५ कोटी) सोबत ‘ॲनिमल’ (१३०.७३ कोटी) आणि ‘गदर २’ (१३३.३७ कोटी) सारख्या चित्रपटांना मागे टाकले होते. या हॉरर कॉमेडीपटाने दुसऱ्या आठवड्यात १३१.३० कोटी रुपयांचा धमाकेदार व्यवसाय केला. त्यामुळे तिसऱ्या आठवड्यात हा सिनेमा काय कमाल करेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत कारण चित्रपटाला देशातील ५०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्याची संधी आहेच पण याशिवाय तो जगभरात ८०० कोटींचा टप्पाही गाठू शकतो.

बॉलिवूडकरांकडून पॅरा ऑलिम्पिकमधील खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव, भारताचे नाव गौरवण्यासाठी अभिमान व्यक्त
‘स्त्री २’ बॉक्स ऑफिस कलेक्शन

sacnilk ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ‘स्त्री २’ ने १६ व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या शुक्रवारी देशात ८.२५ कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले आहे. ‘ॲनिमल’ आणि ‘गदर २’च्या तिसऱ्या शुक्रवारच्या कमाईपेक्षा ही कमाई जास्त आहे. एका दिवसापूर्वीच या चित्रपटाने ८.५० कोटींची कमाई केली होती. त्यामुळे श्रद्धा कपूरचा ‘स्त्री २’ चित्रपटगृहांमध्ये खूप मजबूत पकड धरुन आहे. कडाचित तिसऱ्या वीकेंडला हा सिनेमा नवीन रेकॉर्ड करु शकतो.

कारमध्ये बिघाड,अभिनेत्रीची थेट कंपनीवर कारवाई! मानसिक त्रासामुळे ५० कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा
‘स्त्री २’ जागतिक कलेक्शन

देशात १६ दिवसांत ३३१.३० कोटी रुपयांचे कलेक्शन करणाऱ्या ‘स्त्री २’ने जगभरात ६३०.१५ कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन केले आहे. भारता बाहेर १६ दिवसांत या सिनेमाने १०३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तिसऱ्या आठवड्यात हा चित्रपट जगभरातील ७०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करु शकतो.

Stree 2 ने कमाईत ॲनिमल आणि गदर २ लाही टाकलं मागे, १६ व्या दिवशी सिनेमाने किती कमावले?

‘इमर्जन्सी’ चा ‘स्त्री २’ वर फरक पडणार नाही

या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होत नसल्यामुळे, ‘स्त्री २’ ला पैसे कमविण्याची आणखी संधी आहे. कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट ६ सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, दोन्ही चित्रपटांचे जॉनर खूप वेगळे आहे. त्यामुळे चौथ्या आठवड्यातही ‘स्त्री २’चा कमाईचा वेग कोट्यवधींमध्येच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सिनेमा जगभरात ८०० कोटींच्या क्लबमध्ये कधी प्रवेश करेल याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.