Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची ३१ ऑगस्ट शेवटची तारीख, कसा कराल अर्ज?

11

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३१ ऑगस्ट शेवटची तारीख आहे. ज्या पात्र महिलांनी अद्याप अर्ज केला नाही, तर ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करुन मागील तीन महिन्यांचे पैसे एकत्र घेऊ शकतात.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई : राज्य शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी ३१ ऑगस्ट २०२४ ही शेवटची तारीख आहे. या योजनेचे उद्दिष्ट राज्यातील पात्र महिला आणि मुलींना १५०० रुपये मासिक सहाय्य प्रदान करणं हे आहे.

२.५ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील २१ ते ६५ या वयोगटातील महिला आणि मुली या योजनेसाठी पात्र असून त्यांना या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. या अंतर्गत त्यांना १५०० रुपये मासिक मदत मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्र देणं आवश्यक आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक अकाऊंट डिटेल्स, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, जन्म दाखला, मतदान कार्ड हे कागदपत्र आवश्यक आहेत.
Ladki Bahin Yojana : खात्यात ‘लाडकी बहिण’ योजनेचे पैसे जमा; आता राज्य सरकारचे बॅंकांना महत्वाचे आदेश

ऑनलाईन आणि ऑफलाईनही करता येईल अर्ज

पात्र अर्जदार नियुक्त केंद्रांवर ऑफलाइन नोंदणी करू शकतात. आंगणवाडी, सेतू सुविधा केंद्र, ग्राम सेवक, आशा सेवक, वॉर्ड ऑफिसर अशा ठिकाणी ऑफलाईन अर्ज करता येईल. तसंच प्ले स्टोर किंवा अॅप स्टोरवरुन नारी शक्ती दूत अॅप डाऊनलोड करुन ऑनलाईन ॲपद्वारे अर्ज करू शकता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: वार्षिक अडीच लाख रुपयांच्या उत्पन्नाची मर्यादा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निर्णय जारी

तीन महिन्यांचे पैसे एकत्र येणार

ज्या महिला, मुलींनी अद्यापही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नाही, ते ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे ४५०० रुपये एकत्र मिळतील. तसंच महिलांना त्यांचं बँक अकाऊंट आधार कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे. आधार कार्डशी लिंक असलेल्या अकाऊंटमध्येच पैसे जमा होतील. १४ ऑगस्टपासून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची ३१ ऑगस्ट शेवटची तारीख, कसा कराल अर्ज?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं, की पुढील पाच वर्षांसाठी सरकार ९० हजार रुपये देईल. तर देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितलं, की लाडकी बहीण योजनेसाठी मार्च २०२५ पर्यंत तरतूद करण्यात आली आहे. तसंच दरवर्षी अर्थसंकल्पातही ही तरतूद केली जाईल.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.