Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Crime News: गोमांस नेत असल्याच्या संशयावरुन एका वृद्ध प्रवाशाला धुळे एक्स्प्रेसमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली आहे. वृद्ध प्रवासी कल्याणला त्याच्या लेकीकडे जात होता.
तक्रारकर्त्यानं दिलेल्या फिर्यादीवरुन ठाणे जीआरपी पोलिसांनी ५ पेक्षा अधिक प्रवाशांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १९१(२), १९०, १२६(२), ११५(२), ३२४(४) (५), ३५१(२) (३) आणि ३५२ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. ठाण्याच्या कल्याणमधून ट्रेन जात असताना मारहाणीची घटना घडली.
VIDEO: मी १५ मतं दिली तुम्हाला! भाजप कार्यकर्त्यानं खासदाराला सांगितला बोगस मतदानाचा कारनामा
जळगावमध्ये राहणारे ७२ वर्षीय अशरफ अली सय्यद हुसेन त्यांच्या लेकीला भेटण्यासाठी कल्याणला निघाले होते. ते धुळे एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. यावेळी त्यांचा सहप्रवाशांसोबत सीटवरुन वाद झाला. काही वेळातच वाद विकोपाला गेला. अशरफ अली यांच्याकडे एक बरणी होती. त्यात मांस दिसत होतं. मांसाचे तुकडे पाहून सहप्रवाशांना संशय आला. त्यांनी मांस कशाचं आहे असा प्रश्न केला. त्यानंतर बरेच प्रवासी जमले.
प्लास्टिकच्या बरणीत काय आहे, असा प्रश्न सहप्रवासी तरुणांनी हुसेन यांना अनेकदा विचारला. त्यांनी हुसेन यांना मारहाण, शिवीगाळ सुरु केली. आमचा पवित्र महिना सुरु आहे. श्रावण सुरु असताना तू बैल घेऊन चाललाय, असं म्हणत तरुणांनी हुसेन यांना मारलं. आता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना बोलावतो. मग बघ ते तुझं काय करतात, अशी धमकीही प्रवाशांनी दिली.
Crime News: गोमांस खाल्ल्याचा संशय; टोळक्याची परप्रांतीय मजुराला मरेपर्यंत मारहाण; ५ जणांना अटक
सहप्रवाशांनी घटनेचं मोबाईलमध्ये चित्रीकरण सुरु केलं. बरणीत काय आहे, ते कुठून आणलं, कुठे घेऊन चालला, ते मांस कोण कोण खाणार, अशी प्रश्नांची सरबत्ती सहप्रवाशांनी सुरु केली. यावेळी हुसेन यांना मारहाणदेखील करण्यात आली. त्यांनी बरणी बाजूला ठेवायचा प्रयत्न केला. तेव्हा ते तुझ्या मांडीवर ठेव. खरं खरं बोल. मांस कशाचं आहे. खरं बोललास तर सोडू. नाही तर मारु, अशी धमकी सहप्रवाशांकडून देण्यात आली.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी वृद्ध प्रवाशाला शोधून काढलं. त्यानंतर ठाणे जीआरपीनं ५ पेक्षा अधिक जणांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. वृद्ध प्रवाशी आणि सहप्रवाशांमध्ये आधी सीटवरुन वाद झाला. त्यानंतर सहप्रवाशांना वृद्धाकडे गोमांस असल्याचा संशय आहे. त्यावरुन त्यांनी वृद्धाला मारहाण केली.