Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कशेडी घाटातील दुसरा बोगदा ३ सप्टेंबर पर्यंत सुरू होणार? मुंबई – गोवा महामार्गावरुन जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

6

Mumbai Goa Highway Second Tunnel in Kashedi Ghat : मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दुसरा भुयारी बोगदा ३ सप्टेंबरपर्यंत सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र अद्यापही या मार्गाचं काम अपूर्ण आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अमुलकुमार जैन, रत्नागिरी : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी असणारा कशेडी घाटातील दुसरा भुयारी बोगदा ३ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती आहे. गणेश भक्त या दोन्ही बोगद्यातून मार्गस्थ होतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशेडी बोगद्याच्या पाहणी केला. मात्र प्रत्यक्षात कामाचा वेग पाहता ३ सप्टेंबर पर्यंत हा दुसरा बोगदा चालू होणार का? असा प्रश्न प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली पाहाणी

मागील १७ वर्षे चर्चेत असलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चं काम अद्यापही अर्धवट अवस्थेत असून यंदाही कोकणातील चाकरमान्यांना खड्ड्यातूनच गणेशोत्सव काळात प्रवास करावा लागणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर पळस्पे फाटा ते कशेडी घाटापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे पडले असून प्रवाशांचा प्रवास हा खड्डेमय रस्त्यातून होत असल्याने गणेशोत्सवापूर्वी महामार्ग पूर्ण व्हावा, यासाठी कोकणातील जन आक्रोश समितीमार्फत उपोषण मोर्चे काढण्यात आले आहे. तसंच याबाबत मुंबई उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई आणि राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था पाहता या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह रायगड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांसह या महामार्गाची चार दिवसांपूर्वी पाहणी केली होती.
Mumbai Goa Highway : १७ वर्षांपासून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलं, रस्त्यावर खड्डेच-खड्डे, १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण

३ सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार बोगदा?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगद्यातील दुसऱ्या लेनची पाहणी केली त्यावेळेला त्यांनी दुसरा बोगदा 3 सप्टेंबर पासून गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरत करीत दिवस रात्र काम काम करून कशेडी घाटातील दुसरा बोगदा ३ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदार यांना दिल्या आहेत.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याच्या दुसऱ्या मार्गिकेचं काम युद्ध पातळीवर करावं, अशा सूचना दिल्या होत्या. संबंधित अधिकारी आणि ठेकेदार त्यांनी ३ सप्टेंबर पर्यंत दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्ण करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिलं, मात्र आज प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली असता बोगद्याच्या दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे अपूर्ण अवस्थेत असल्याचं दिसून आलं. तसंच बोगद्यामधील सिमेंट काँक्रीट रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. युद्ध पातळीवर काम करणार असल्याचं ठेकेदारांनी म्हटलं असलं, तरी प्रत्यक्षात मात्र काम संथ गतीने चालू असल्याचं दिसतं.
Mumbai goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग आंदोलन तीव्र, सामान्यांचा जनक्षोभ होण्याचा इशारा; मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार

बोगद्यांना जोडणारे रस्ते अपूर्ण अवस्थेत

दुसऱ्या बोगद्याच्या भोगाव गावाकडील बाजूला अजून भराव काढण्याचं काम चालू असून इथे सध्या बाजूला असलेल्या पुलाजवळील रस्ता जोडल्याचं दिसून येत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडकडे जाणाऱ्या दुसऱ्या बोगद्याचं काम पोपट्याच्या बाजूला असणारे गटारे अपूर्ण अवस्थेत आहेत. बोगद्यामध्ये तीन – चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. तसंच दोन्ही बोगद्यांना जोडणारे रस्ते अपूर्ण अवस्थेत आहेत. आतापर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याच्या अनेक तारखा दिल्या गेल्या, मात्र तारीख पे तारीख असा मुंबई गोवा महामार्गाचा प्रवास चालू आहे. तशीच काहीशी अवस्था त्या दुसऱ्या बोगद्याची तर होणार नाही ना अशी प्रवासी वर्गाकडून प्रश्न विचारला जात आहे.

प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन त्या पद्धतीने काम होताना दिसत नाही. त्यामुळे अधिकारी वर्ग आणि ठेकेदार याबाबत किती संवेदनशील आहेत हे दिसून येत आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी गोसावी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र शाखा अभियंता अमोल महाडकर यांच्याशी संपर्क साधला असता ३ तारखेपर्यंत आम्ही दुसऱ्या बोगद्यातून वाहतूक चालू करू अशी माहिती देण्यात आली आहे.

कशेडी घाटातील दुसरा बोगदा ३ सप्टेंबर पर्यंत सुरू होणार? मुंबई – गोवा महामार्गावरुन जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

पाऊस आणि चिखलाचे साम्राज्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगद्यातील दुसरा बोगदा ३ सप्टेंबर पूर्वी चालू करण्याचे संकेत दिले होते, मात्र प्रत्यक्षात कशेडी बोगद्यात जाऊन पाहणी केली असता पोलादपूरकडून खेडकडे जाणाऱ्या अॅप्रोच रोडवर मोठ्या प्रमाणावर चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे. त्यातच मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पावसामुळे चिखलात पाणी साचून चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे. या रोडचं काम घाईमध्ये केल्यास ते निकृष्ट दर्जाचे होईल असं जाणकारांचं म्हणणं आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.