Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

प्रवाशांचा अपेक्षाभंग! वांद्रे- मडगाव एक्सप्रेसला खेड थांबा नाही, योगेश कदमांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

9

Bandra Madgaon Express : मुंबई वांद्रे येथून थेट मडगाव येथे सुरू करण्यात आलेल्या ट्रेनला खेड येथे थांबा देणे वगळण्यात आले आहे. याच बाबीसाठी आमदार योगेश कदम यांनी थेट केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आमदार योगेश कदम यांनी रेल्वेमंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांना पत्र लिहिले आहे
प्रसाद रानडे,रत्नागिरी : मुंबई वांद्रे येथून थेट मडगाव येथे सुरू करण्यात आलेल्या ट्रेनला खेड येथे थांबा देण्यात आलेला नाही. मुंबईच्या उपनगरातून थेट कोकणात मडगाव पर्यंत सुरू झालेली ही पहिली रेल्वे आहे. त्यामुळेच रेल्वेला खेड येथे थांबा मिळेल अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र अपेक्षाभंग झाला आहे आता या नाराजीला शिवसेनेचे दापोली खेड मंडणगडचे आमदार योगेश कदम यांच्या पत्राने वाचा फोडली आहे. यासंदर्भात थेट केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्र लिहून आपली नाराजी स्पष्टपणे कळवली आहे.

रत्नागिरी आणि चिपळूण असे दोनच थांबे रत्नागिरी जिल्ह्यात देण्यात आले आहेत. यावरूनच शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार योगेश कदम त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना थेट पत्र लिहून खंत व्यक्त केली आहे. कदम म्हणाले, खेड थांब्याचा समावेश केल्यास त्यानंतर खेड थांब्याचा समावेश करण्यासाठी लागणारी अवघड प्रक्रिया टाळता येईल. CC-२९८/२०२४ दिनांक २७/०८/२०२४ ही रेल्वे सेवा वांद्रे, बोरिवली आणि कोकण रेल्वेच्या विविध गंतव्यस्थानांदरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे आश्वासन देत असताना, अंतिम मंजुरीमध्ये रत्नागिरी जिल्हयातील खेड, दापोली व मंडणगड या तीन तालुक्यांना जोडणारे महत्वपुर्ण असलेल्या खेड स्थानकाचा समावेश नाही याबद्दल खेद व्यक्त करण्यात आली आहे. ही रेल्वे सुरू करण्यात आल्याबद्दल धन्यवाद देताना आपल्या या मागणीचा आपण विचार करून आपण योग्य असा प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आमदार योगेश कदम यांनी दिलेल्या पत्रामधून व्यक्त केली आहे.
Mumbai Local News: नव्या लोकलमार्गिकांना वेग, महामुंबईत १६ हजार कोटींची कामे, रेल्वेमंत्री वैष्णव यांची माहिती

खेड येथे जादा रेल्वे सेवेची जोरदार आणि सातत्यपुर्ण मागणी होती. नव्या ट्रेनमुळे ही गरज पूर्ण होईल, अशी आशा अनेकांना होती. अंतिम मंजुरीमध्ये खेड येथे थांबा वगळणे ही बाब निराशाजनक आहे. महत्वाच्या स्थानकावरुन प्रवास करणाऱ्या संभाव्य फायद्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा स्पष्टपणे या पत्रात नमूद करण्यात आला आहे. सेवेच्या प्रारंभापासून खेड येथे थांबा समाविष्ट केल्याने मोठया संख्येने प्रवाशांसाठी तिची सुलभता आणि सुविधा मोठ्या प्रमाणात वाढेल. हा थांबा आत्ता लागू केल्यास नंतरच्या तारखेला अतिरिक्त थांब्यांची विनंती करण्याची अवघड आणि अनेकदा लांबलचक प्रक्रिया टाळता येईल असे कदम म्हणाले आहेत.

प्रवाशांचा अपेक्षाभंग! वांद्रे- मडगाव एक्सप्रेसला खेड थांबा नाही, योगेश कदमांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

पुढे कदम म्हणाले, माझा ठाम विश्वास आहे की खेड येथे थांबा जोडणे हे प्रवासी लोकांसाठी अत्यंत मोलाचे ठरेल. या भागातील रेल्वे प्रवाशांसाठी सुधारित कनेक्टिव्हिटी आणि सोयीसाठी ही बाब महत्त्वाचे असल्याचे आमदार योगेश कदम यांनी पत्राद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनकुमार वैष्णव यांचे लक्ष वेधलं आहे. दरम्यान या पत्र्यानंतर आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव हे दखल घेऊन खेड येथे थांबा मंजूर करतात का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. खेड येथे थांबा मंजूर केल्यास मुंबई उपनगरात राहणाऱ्या अनेक प्रवाशांना या रेल्वेमुळे मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. की यातही श्रेय वादाची लढाई रंगणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

प्रतीक्षा बनसोडे

लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.