Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Sholay Film Re-Release: भारतीय चित्रपटसृष्टीतील या अजरामर चित्रपटाने शनिवार, ३१ ऑगस्टला ‘रिगल’चा पडदा पन्नास वर्षांनी पुन्हा एकदा उजळला. फिल्म हेरिटेज फाउंडेशनतर्फे (एफएचएफ) ५० वर्षे जुन्या सिनेमास्कोप प्रिंटच्या खास शोचे निशुल्क आयोजन शनिवारी करण्यात आले होते.
हायलाइट्स:
- रिगल चित्रपटगृह रसिकांनी घेतले डोक्यावर
- संवादांना आजही भरभरून दाद
- लहानथोर चित्रपटप्रेमींची उपस्थिती
‘प्रोजेक्शनिस्ट म्हणून पन्नास वर्षांचा अनुभव असलेले मोहम्मद असलम फकीह यांनी या विशेष प्रिंटचे प्रोजेक्शन केले. सत्तरच्या दशकातील गाजलेल्या अनेक चित्रपटांचे पटकथालेखक सलीम-जावेद यांच्या सन्मानार्थ हे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते,’ असे एफएचएफचे संस्थापक शिवेंद्रसिंह डुंगरपूर यांनी सांगितले. एफएचएफ आर्काइव्हमध्ये जतन केलेल्या चित्रपटाच्या प्रिंटला स्क्रीनिंगची परवानगी दिल्याबद्दल त्यांनी शहजाद सिप्पी यांचेही आभार मानले.
कंगनाच्या इमर्जन्सीच्या रिलीजवर सेन्सॉरकडून अजूनही प्रश्नचिन्हच! अभिनेत्रीला जीवे मारण्याच्या धमक्या
‘सलीम-जावेद यांनी लिहिलेले चित्रपटातील संवाद अतिशय लोकप्रिय आहेत, ते कालातीत आहेत. कितीही वेळा ‘शोले’ पाहावा, पाहिलाय, पाहतोय… तोच रोमांच, तसाच थरार. ४९ वर्षांनंतरही ‘शोले’चे आकर्षण कायम राहिलेय. ‘रिगल’मध्ये श्रेयनामावलीपासूनच रसिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद जबरदस्त होता. अनेक दृश्ये व संवादांना आजही थिएटर डोक्यावर घेतले गेले. अद्भूत आणि अद्भुतच,’ अशी प्रतिक्रिया या विशेष खेळाला उपस्थित असलेले ज्येष्ठ चित्रपटसमीक्षक दिलीप ठाकूर यांनी ‘मटा’सोबत बोलताना व्यक्त केली.
असेही गारुड!
एखाद्या चित्रपटाचे प्रेक्षकांवर किती गारुड असू शकते, याचे ताजे उदाहरण म्हणजे लवकरच ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेल्या या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केले आहे. एखाद्या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन कथा लिहिली जाते, त्याचा पुढे चित्रपट होतो, असे या निमित्ताने भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव या चित्रपटात शीर्षक भूमिकेत आहे.