Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Sindhudurg Shivaji Maharaj Statue Accused Chetan Patil: सिंधुदुर्ग राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याला काल दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
हायलाइट्स:
- चेतन पाटील याला ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
- जयदीप आपटेच्या शोधासाठी दोन पोलीस पथक
- जरांगे पाटील आज राजकोट येथे भेटणार
Jode Maro Andolan: महाविकास आघाडीचे आज ‘जोडे मारो’ आंदोलन; मालवण पुतळा दुर्घटनेचा निषेध करणार
या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेतील गुन्हा दाखल करण्यात आलेला दुसरा संशयित आरोपी शिल्पकार असलेला जयदीप आपटे त्याच्या शोधासाठी मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांचं पथक अशी दोन पथक त्याच्या शोधासाठी पाठवण्यात आली आहेत. जयदीप आपटे याचे काही निकटवर्तीय असलेल्या काही लोकांच्या फोनचे सीडीआर तपासण्याचे कामही पोलिसांकडून सुरू आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, राजकोट येथे उबाठा आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ४२ जणांपैकी शनिवारी संध्याकाळी उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसून त्या सगळ्यांचा शोध सुरू आहे, अशीही माहिती मालवण पोलिसांकडून देण्यात आली.
जरांगे पाटील आज राजकोट येथे भेटणार
मनोज जारांगे पाटील रविवारी एक सप्टेंबर रोजी मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करणार आहेत. आज रविवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान देउलवाडा तिथून चालत ते राजकोट किल्यावर १० वाजता घटनास्थळी पाहणी करणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधवही त्यांच्या समवेत उपस्थित असणार आहेत. नंतर ते कुडाळच्या दिशेने जाणार आहेत. मालवण दौऱ्यात जरांगे पाटील कोणती भूमिका मांडतात याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.