Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 1 Sept 2024, 6:50 pm
Maharashtra Assembly Election: लोकसभा निवडणुकीवेळी तटस्थ राहिलेले, शरद पवारांची अप्रत्यक्षपणे मदत करणारे रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे.
भाजपच्या दोन बड्या नेत्यांविरोधातल्या तक्रारी घेऊन काही पदाधिकारी रामराजे नाईक निंबाळकरांच्या भेटीला गेले होते. त्यांच्याशी निंबाळकर यांनी संवाद साधला. ‘भाजपसोबत आपलं काही भांडण आहे का? आपण काय हिंदुत्व मुस्लिम करतो का? आपली तक्रार रणजितसिंह निंबाळकर आणि त्यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत माजवत फिरतात, त्यांच्याविरोधात आहे. त्यांना भाजपनं सत्तेतून साथ देऊ नये हीच आपली मागणी आहे,’ असं निंबाळकर कार्यकर्त्यांना म्हणाले.
भाजप म्हटलं की त्यांचं डोकं उठतं! दादांच्या आमदाराला मतदान नाही! भाजप नेत्यानं वात पेटवली
आपल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी एक बैठक घेऊ. त्यासाठी तुम्ही तयारीनं या. महिलांनादेखील येऊ द्या. एक तास कार्यक्रम घेऊ. तक्रारीचं निवारण होतंय का ते बघू. नाही तर आपल्याला तुतारी वाजवायला किती वेळ लागतो?, असा सवाल निंबाळकर यांनी विचारला. यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यावर आता अजून काही बोलायचं राहिलंय का, असा प्रश्न त्यांनी केला.
भाजपचे नेते समरजीत घाटगे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटीलदेखील भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. तेदेखील शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. आता फलटणचे रामराजे नाईक निंबाळकरदेखील महायुतीमधून बाहेर पडण्याचे संकेत देत आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना तसं सूचक विधान केलं आहे.
Maharashtra Assembly Election: महायुतीचा फॉर्म्युला ठरला! १० दिवसांत घोषणा; भाजप , शिंदेसेना, अजितदादांना किती किती जागा?
फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या पाठिंब्यावर आमदार झालेले दीपक चव्हाण सध्या केवळ नावापुरते महायुतीसोबत आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी तटस्थ भूमिका घेत अप्रत्यक्षपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळे विधानसभेला रामराजे हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे. रामराजे नाईक निंबाळकर २०१६ ते २०२२ अशी सहा वर्षे विधान परिषदेचे सभापती राहिले आहेत.