Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Assembly Election CM Face Survey: विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली असताना महायुती आणि महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर एक सर्व्हे करण्यात आला.
मुख्यमंत्रिपदामुळे घडलेलं महाभारत महाराष्ट्रानं गेल्या पाच वर्षांमध्ये पाहिलं. राज्यात सध्या दोन आघाड्या आणि सहा पक्ष आहेत. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक अभूतपूर्व असेल. महायुती, महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास मुख्यमंत्रिपद पुन्हा एकदा कळीचा मुद्दा ठरु शकतो. त्यासाठी पुन्हा रस्सीखेच पाहायला मिळू शकते. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ सेफॉलॉजिस्ट दयानंद नेने यांनी १६ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत राज्यात एक सर्वेक्षण केलं. निवडणुकीनंतर कोणाला मुख्यमंत्रिपदी पाहायला आवडेल, असा प्रश्न त्यांनी लोकांना विचारला होता.
भाजपच्या बैठकीला दांडी, पवारांच्या भिडूंच्या क्लबला हजेरी; बडा नेता लवकरच हाती घेणार तुतारी?
राज्यातील जनतेचा मूड नेनेंनी केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आला. सर्व्हेत सहभागी झालेल्या २३ टक्के जणांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती दर्शवली. तर दुसऱ्या स्थानावर शिवसेना उबाठाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यांना २१ टक्के मतं मिळाली आहेत. तर तिसऱ्या नंबरवर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. शिंदेच मुख्यमंत्रिपदी राहावेत असं १८ टक्के लोकांना वाटतं.
विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं ७ टक्के लोकांना वाटतं. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनादेखील ७ टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्यमंत्री व्हावेत असं केवळ २ टक्के लोकांना वाटतं. सर्व्हेत सहभागी झालेल्या २२ टक्के लोकांनी ‘माहीत नाही’ हा पर्याय निवडला आहे.
तुतारी हाती घ्यायला किती वेळ लागतो? दादा गटातील सीनिअर नेत्याचं सूचक विधान अन् चर्चांना उधाण
कोणाला कोणत्या भागातून पाठिंबा?
१. देवेंद्र फडणवीस- प्रामुख्यानं नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, मुंबई, एमएमआर, पुणे, नाशिकमधून पाठिंबा
२. उद्धव ठाकरे- प्रामुख्यानं मुंबई, संभाजी नगर, धाराशिव आणि हिंगोलीतून पाठिंबा
३. एकनाथ शिंदे- ठाणे, एमएमआर, संभाजी नगर, जळगाव, कोल्हापूरातून पाठिंबा
४. अजित पवार/सुप्रिया सुळे- राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातून पाठिंबा
५. नाना पटोले- भंडारा, चंद्रपुरातून पाठिंबा