Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का, समर्थक भाजप सोडण्याच्या तयारीत, काँग्रेस प्रवेशाचे संकेत

10

Devendra Fadnavis supporter leaves BJP : विधानसभा निवडणूक जवळ येत असताना आणखी एक माजी आमदार भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
देवेंद्र फडणवीस-नाना पटोले
गोंदिया : जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे, तसे भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक मानले जाणारे एक एक नेते सध्या पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. मागील महिन्यात पूर्व विदर्भातून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करून फडणवीस यांना एक प्रकारे धक्का दिला होता. तर आता आणखी एक माजी आमदार भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. आगामी 10 तारखेला संबंधित माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये घरवापसीचे संकेत मिळत आहेत.

कोण आहे हा नेता?

संबंधित व्यक्ती गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 2004, 2009 आणि 2014 वर्षाच्या विधानसभा निवडणुकीत संबंधित माजी आमदारांनी काँग्रेसच्या पक्षामार्फत निवडणूक जिंकलेली आहे. ते विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचे (पीएसी) अध्यक्षही होते. सलग दोन टर्म भंडारा- गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेचे आमदार पण राहिलेले आहेत.Ajit Pawar : काँग्रेसच्या तिघांसह ६ आमदार राष्ट्रवादीसोबत, अजित दादांचा खणखणीत दावा, जागा वाढवून मागितल्या
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवली मात्र निवडणुकीत पराभूत झाले. 2019 च्या दारुण पराभवानंतर संबंधित आमदार राजकीय अज्ञातवासात गेले. आपलं नाव डावलून विधानसभा सदस्यांमार्फत निवडून द्यावयाच्या विधानपरिषद उमेदवारीवर माजी मंत्री परिणय फुके यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच संबंधित आमदारांची नाराजी ही अधिकच वाढत गेली.

देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का, समर्थक भाजप सोडण्याच्या तयारीत, काँग्रेस प्रवेशाचे संकेत

तिकीट मिळण्याची खात्री नाही

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षामार्फत तिकीट मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने संबंधित माजी आमदार यांची अस्वस्थता पक्षांतर करायला कारणीभूत ठरते आहे असं पण बोललं जातंय. संबंधित आमदारांकडून काँग्रेस घरवासी संदर्भात दुजोरा मिळालेला नसला तरी त्यांच्या काही समर्थकांचं बोलणं बरंच काही सांगून जात आहे.

सध्या गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे विनोद अग्रवाल अपक्ष आमदार आहेत. त्यांचा भाजपला पाठिंबा आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मार्फत पूर्व विदर्भात मोठ्या हालचाली सुरू असल्याचं समजतंय. या ‘करेक्ट कार्यक्रमा’ची मात्र गोंदिया जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून सर्वत्र चर्चा पाहायला मिळते आहे.

पाचेंद्रकुमार टेंभरे

लेखकाबद्दलपाचेंद्रकुमार टेंभरेपाचेंद्रकुमार टेंभरे, महाराष्ट्र टाइम्समध्ये Videographer आहेत. २००० सालापासून ते पत्रकारितेत आहेत. दूरदर्शनपासून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. सह्याद्री वाहिनी, साम टीव्ही या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. २०२० पासून ते महाराष्ट्र टाइम्समध्ये आहेत…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.