Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Heritage Sites In Pune: ऐतिहासिक ठिकाणांना ‘हेरिटेज लूक’; पुणे महानगरपालिकेने खासगी कंपन्यांकडून मागविले प्रस्ताव

9

Heritage Sites In Pune: अत्यंत वर्दळीच्या असलेल्या या परिसराला हेरिटेज लूक देताना नागरिकांना पायी चालणे सुलभ व्हावे, या दृष्टीने रस्ते, पदपथ तयार करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स
heritage sites
पुणे : ग्रामदैवत कसबा गणपती, लाल महाल, शनिवारवाडा, नानावाडा, महात्मा फुले मंडई, तुळशीबाग या पुण्याची ऐतिहासिक ओळख असलेल्या ठिकाणांना आता ‘हेरिटेज लूक’ प्राप्त होणार आहे. या ठिकाणांच्या परिसरातील रस्ते, साजरा होणारा उत्सव, बस आणि मेट्रो स्थानक, दुकानांवरील पाट्या यांना तत्कालीन रूप देण्यात येणार असून, शहराच्या मध्यभागातून फिरताना शिवकाळ आणि पेशवाईतील पुण्याची अनुभूती नागरिकांना घडणार आहे. देदीप्यमान मराठी स्वराज्यात वावरत असल्याचा अनुभव नागरिक घेऊ शकतील.

पुणे महापालिकेने या प्रकल्पाबाबत खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव (रिक्वेस्ट फॉर प्रपोझल) मागितले असून, तीन कंपन्यांकडून प्रस्ताव सादर झाले आहेत. या प्रस्तावांची छानणी झाल्यानंतर त्याबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे वाहतूक नियोजनकार निखिल मिजार यांनी सांगितले. पुणे शहराचा ऐतिहासीक वारसा मोठा आहे. शिवराय आणि राजमाता जिजाऊंनी सोन्याच्या नांगर फिरवलेल्या पुण्यनगरीतून पेशवाईत देशाची सूत्रे फिरवली जात होती. हा सर्व काळ पुन्हा एकदा पुणेकरांना अनुभवता यावा यासाठी टिळक चौक (अलका चौक) ते क्वार्टर गेट चौक, सिमला ऑफिस चौक, शनिवारवाडा, कसबा गणपती, लाल महाल, नाना वाडा, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर, मंडई, तुळशीबाग आणि विश्रामबागवाडा या परिसराला ‘हेरिटेज लूक’ देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

कितने आदमी थे?… हाऊसफुल्ल, सरदार! अर्धशतकानंतरही ‘शोले’साठी मुंबईत चित्रपटगृह तुडुंब
अत्यंत वर्दळीच्या असलेल्या या परिसराला हेरिटेज लूक देताना नागरिकांना पायी चालणे सुलभ व्हावे, या दृष्टीने रस्ते, पदपथ तयार करण्यात येणार आहे. याशिवाय या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या परिसरात असलेले हॉकर्स, होर्डिंग्ज, दुकानांवरील पाट्या या सगळ्यांना विशिष्ट ‘थीम’मध्ये करण्याचा प्रस्ताव आहे त्यासाठी हे काम देण्यात येणाऱ्या कंपनीने या सर्व परिसराचे छोट्या-मोठ्या दुकांनासह सर्वेक्षण करणे अपेक्षित असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. प्रस्ताव सादर करणाऱ्या कंपन्यांनी देशभरात अशा प्रकारे विकास करण्यात आलेल्या तीन ‘हेरिटेज साईट’चा ‘केस स्टडी’ सादर करणे बंधनकारक केले आहे. यामुळे महापालिका प्रशासनास या सर्व परिसराचा विकास करताना अपेक्षित बदलांचा अंदाज साधता येणार आहे.

महापालिका प्रशासनाने शहराच्या मध्यवर्ती भागाला ‘हेरिटेज लूक’ देण्यासाठी प्रस्ताव मागवले होते. प्रशासनास तीन प्रस्ताव सादर झाले असून, त्यावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत.– निखिल मिजार, वाहतूक नियोजन अधिकारी

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.