Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Narayan Rane Slams Uddhav Thackeray: भाजप नेते नारायण राणेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेत ठाकरे कुटुंबावर तोफ डागली आहे. ठाकरेंसारखा बावळट माणूस पाहिला
नारायण राणेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर तिखट शब्दांत टीका केली. त्यांनी उद्धव यांचा सातत्यानं एकेरी उल्लेख केला. ‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोंना हा माणूस जोडो मारतो. मुख्यमंत्र्यांना गेट आऊट म्हणतो. अरे तुझी लायकी काय? कोण आहेस तू? असा नेता असतो का? तुलाच जनतेनं अडीच वर्षांपूर्वी गेट आऊट म्हटलंय,’ अशा भाषेत राणेंनी ठाकरेंवर तोफ डागली.
Narayan Rane: आदित्य आलाय, पण जाणार नाही, तेव्हाच पोलिसांना सांगितलेलं! राणेंकडून राजकोटवरील घटनाक्रम कथन
राणेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेत मातोश्रीवरील एक किस्सा सांगितला. ‘मी शिवसेनेत असताना एकदा एका कामासाठी मातोश्रीवर गेलो होतो. त्यावेळी मला काही वेळ वाट पाहण्यास सांगण्यात आलं. उद्धव ठाकरे नवे कपडे ट्राय करुन बघत होते. त्यांनी शर्ट, पँट, जॅकेट अंगावर चढवलं. त्यानंतर मग एक वेगळाच पोषाख परिधान केला. तो वरपासून खालपर्यंत एकच होता. अजिबात शोभत नव्हता. मला उद्धवने विचारलं, कसा वाटतोय? मलाही त्याची विकेट काढायची होती. मी म्हटलं साहेब शोभून दिसतोय. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा आहे,’ अशा शब्दांत राणेंनी मातोश्रीवरील किस्सा कथन केला. उद्धवसारखा बावळट माणूस पाहिला नसल्याचं राणे म्हणाले.
Maharashtra Vidhan Sabha Elections: महायुतीला ७ जिल्ह्यांत भलामोठा भोपळा; विदर्भ, मराठवाड्यात फटका; चिंता वाढवणारा सर्व्हे
२००४ मध्ये काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्त्वात आम्ही आंदोलन केलं. अय्यरच्या फोटोला जोडे मारले. आता त्याच बाळासाहेबांचा मुलगा काँग्रेससोबत गेला आहे आणि जोडे मारो आंदोलन करतोय. याला पक्ष सांभाळता आला नाही. हा काय मुख्यमंत्री होणार? ४० आमदार याला सोडून गेले, अशी टीका राणेंनी केली.
Narayan Rane: मला उद्धवची विकेट काढायचीच होती! म्हटलं, साहेब भारी दिसताय! नारायण राणेंनी सांगितला किस्सा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जाहीर माफी मागितली. त्यांच्या माफीला उद्धव ठाकरे मग्रुरीची भाषा म्हणतो. मोदींवर बोलण्याची तुझी लायकी नाही. असा भ्रष्ट माणूस मी आतापर्यंत पाहिला नाही. करोना काळात औषधांच्या टेंडरमध्ये १५ टक्के घेतले. शिवसेनेत राहिलेल्या सगळ्या नेत्यांनी मातोश्रीवर वर्षानुवर्षे पैसे पोहोचवले. त्याची पावती कधी यानं दिली नाही. आता पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय. त्यासाठी काँग्रेस, पवारांच्या घरचे उंबरे झिजवतोय, अशा शब्दांत राणे माजी मुख्यमंत्र्यांवर तुटून पडले.