Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बॅच घेऊन परतताना बसची धडक; बाप्पाच्या सेवेची इच्छा अधुरीच; तरुणीच्या मृत्यूनं कुटुंब शोकाकुल

9

Lalbaug Bus Accident: मुंबईच्या लालबागमध्ये बेस्टची बस गर्दीत शिरल्यानं आठ जण जखमी झाले. यापैकी एका जखमी तरुणीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई: गर्दीत बेस्टची बस शिरल्यानं आठ जण जखमी झाल्याची घटना मुंबईतील लालबागमध्ये घडली. जखमींपैकी एका तरुणीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. नुपूर सुभाष मणियार असं मृत पावलेल्या तरुणीचं नाव असून तिच्यावर केईएम रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. तिच्या छातीला आणि ओटीपोटाला गंभीर स्वरुपाची इजा झाली होती. उपचारांदरम्यान तिची प्राणज्योत मालवली. तिच्या निधनानं कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

गणेशोत्सवाआधीचा रविवार असल्यानं नागरिकांनी लालबागमध्ये काल खरेदीसाठी गर्दी केली. रात्री साडे आठच्या सुमारास बेस्टची ६६ क्रमांकाची बस लालबागच्या गरम खाडा मैदानासमोरुन जात होती. त्यावेळी बसमधील एका दारुड्या प्रवाशानं क्षुल्लक कारणावरुन चालकासोबत हुज्जत घातली. दारुड्यानं जबरदस्तीनं बसचं स्टेअरिंग फिरवल्यानं अपघात झाला. त्यात आठ जण जखमी झाले. त्यातील एका जखमी तरुणीचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.
Lalbaug Bus Accident : लालबागला गणेशभक्तांच्या गर्दीत बेस्ट बस घुसली, गाड्यांना धडक, आठ पादचारी जखमी, कारण चक्रावून टाकणारं
२७ वर्षांची नुपूर मणियार गणेशोत्सवादरम्यान स्वयंसेवक म्हणून काम करायची. यंदाच्या गणेशोत्सवातही बाप्पाची सेवा करण्याचा तिचा मानस होता. त्यासाठी ती स्वयंसेवकाचा बॅच घेण्यासाठी रविवारी रात्री गेली होती. बॅच घेऊन परतत असताना तिला बसनं मागून धडक दिली. तिच्या छातीला, ओटीपोटाला गंभीर दुखापत झाली. तिच्यावर केईएमच्या आयसीयू वॉर्डमध्ये उपचार सुरु होते. पण उपचारांदरम्यान तिची मृत्यूशी झुंज संपुष्टात आली.

नुपूर मणियार प्राप्तिकर विभागात क्लर्क पदावर कार्यरत होती. बाप्पाच्या सेवेसाठी ती गणेशोत्सवात स्वयंसेवक म्हणून काम करायची. यंदाही तिला गणपती बाप्पाची सेवा करायची होती. पण त्याआधीच काळानं तिच्यावर घाला घातला. त्यामुळे मणियार कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे. नुपूर आई आणि लहाण बहिणीसोबत राहत होती. नुपूरच्या अकाली निधनानं दोघींना धक्का बसला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Elections: महायुतीला ७ जिल्ह्यांत भलामोठा भोपळा; विदर्भ, मराठवाड्यात फटका; चिंता वाढवणारा सर्व्हे
बेस्ट बसमधील दारुड्या प्रवाशानं चालकासोबत घातलेला वाद आणि त्यानंतर जबरदस्तीनं फिरवलेलं स्टेअरिंग नुपूरसाठी जीवघेणं ठरलं. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना धडकली. बस अचानक वेडीवाकडी चालू लागल्यानं या ठिकाणी असलेल्या नागरिकांची पळापळ सुरु झाली. यात आठ जण जखमी झाले. चालकानं वेळीच नियंत्रण मिळवल्यानं पुढील अनर्थ टळला.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.