Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ नागरिकांचा प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान करण्यात आला आहे. अध्यक्ष सागर पाटील यांनी दहा टक्के लाभांश व विशेष दिवाळी बोनस जाहीर केल्याने सभासदांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सर्व ठरावांना सभागृहात उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. पतपेढीचे अध्यक्ष सागर पाटील यांनी सभासदांना दहा टक्के इतका चांगला लाभांश जाहीर केल्याने सभासदांकडून समाधान व्यक्त होत आहे. याचबरोबर दीड टक्का दिवाळी भेट देण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा असल्याचे सूतोवाच करत एक प्रकारे दिवाळी बोनस गिफ्ट मिळणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे.
विद्यमान संचालक मंडळाने व्यवस्थापन खर्चात गतवर्षीच्या तुलनेत ३६ लाख ६४ हजार रुपयेची बचत केली आहे. यासह सभासदांना अत्यंत उपयुक्त असे मोबाईल ॲप सुरू केल्याने आणि सभासद हिताची तसेच पतपेढीच्या विकासासाठी करत असलेल्या कामांबाबत संचालक मंडळाचा अभिनंदनचा ठराव करण्याचे उपस्थित सभासदांनी एकमताने संमत केला आहे. नावीन्यपूर्ण मोबाईल ॲपचे उद्घाटन अलीकडेच उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते.
uday samant : मंत्री उदय सामंतांनी सांगितला रतन टाटा यांच्या भेटी मागचा मोठा किस्सा….
सभेच्या सुरुवातीला सभासदांचे गुणवत्ताधारक विद्यार्थी व सेवानिवृत्त सभासद यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. सोपान शिंदे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तर पतपेढीच्या इतिहासात प्रथमच पतपेढीच्या सेवा जेष्ठ सभासदाला प्रथमच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी होण्याचा बहुमान देण्यात आला होता. पतपेढीच्या कार्यरत सभासदांमधील सेवा जेष्ठ सभासद दिनेश महाकाळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ.सोपान शिंदे यांनी माध्यमिक पतपेढीचे कामकाज आदर्शवत असून सभासद हिताचे अनेक निर्णय विद्यमान संचालक मंडळ घेत असल्याचे आपल्या मनोगत व्यक्त केले.
Ratnagiri : माध्यमिक शिक्षक पतपेढीचा अनोखा उपक्रम, ज्येष्ठ भागधारक सभासद बनले प्रमुख अतिथी
रोहित जाधव, गजानन पाटणकर, संजय चव्हाण, संदेश रहाटे, सुशांत कविस्कर, अवी पाटील, विलास कोळेकर, सुरेश व्हटकर,सुनील जाधव,मंगेश जाधव, मंगेश सावंत,अरुण शिंदे,कुमार गावडे,रमेश ढोले,राकेश मानके,सुनील मदने,महेश पाटकर,संदेश कांबळे,हनुमंत सरवळे इत्यादी सभासदांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. लांजा व चिपळूण शाखेच्या समस्यांबाबत चर्चा करून यासंदर्भात संबंधित तालुक्यात सभा घेऊन निर्णय घेण्यात यावा, ठेवीवरील अंशदानाची कपात ठेवीवरील व्याजदरातून करण्यात यावी, नवीन कर्मचारी सेवानियमावलीला तसेच संचालक मंडळाने सुचविलेल्या उपविधी दुरुस्तीला सभेने मान्यता दिली. यावेळी ज्येष्ठ संचालक प्रदिप वाघोदें सह अन्य सर्व संचालक उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन संचालक विलास शिंदे, किशोर नागरगोजे, संजय अवेरे, रविंद्र हरावडे, सुभाष सोकासने यांनी केले तर आभार उपाध्यक्ष सुनिल केसरकर यांनी मानले.
Ratnagiri : माध्यमिक शिक्षक पतपेढीचा अनोखा उपक्रम, ज्येष्ठ भागधारक सभासद बनले प्रमुख अतिथी
पतसंस्थेच्या व्हाइस चेअरमनपदी दापोलीचे किशोर नागरगोजे
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी दापोली येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक किशोर प्रभाकर नागरगोजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. रत्नागिरी येथे रविवारी ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही बिनविरोध निवड करण्यात आली. पतसंस्थेचे अध्यक्ष सागर पाटील व संचालकांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. श्री.नागरगोजे यांच्या रूपाने दापोलीला तालुक्याला बहुमान मिळाला आहे. दापोली येथील ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. सरोज मेहता,सचिव सुजय मेहता व संचालक मंडळाकडूनही अभिनंदन करण्यात आले आहे. नूतन व्हॉइस चेअरमन किशोर नागरगोजे यांचे शैक्षणिक,सामाजिक, राजकीय अशा विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.