Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ajit Pawar: महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याची तक्रार विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांकडे केली.
‘महायुतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. खोट्या केसेस टाकल्या जात आहेत.भाजपमध्ये येण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फोन करुन दबाव टाकला जातोय,’ अशा तक्रारींचा पाढा नाईक निंबाळकरांनी वाचून दाखवला. त्यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी भाष्य केलं. ‘फक्त आपल्याला गरज नव्हती, दिल्लीलाही दादांचं नेतृत्त्व हवं होतं. आमच्या पक्षातील लोकांचा सन्मान राखला जायला हवा. हुलकावणी कशी द्यायची ते रामराजेंना चांगलं माहीत आहे,’ असं तटकरे म्हणाले.
Narayan Rane: मला उद्धवची विकेट काढायचीच होती! म्हटलं, साहेब भारी दिसताय! नारायण राणेंनी सांगितला किस्सा
रामराजे नाईक निंबाळकरांच्या तक्रारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ऐकून घेतल्या. याबद्दल लवकरच भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी बोलतो, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं. ‘मी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी बोलेन. खालच्या लोकांशी मी का बोलू? मी मोदी, शहा, फडणवीसांशी बोलेन,’ असं अजित पवार म्हणाले. भाजपवाले आमचे कार्यकर्ते का फोडत आहेत? समोर ३ विरोधी पक्ष आहेत. त्यांचे कार्यकर्ते फोडा ना, असे त्यांनी म्हटलं.
Narayan Rane: आदित्य आलाय, पण जाणार नाही, तेव्हाच पोलिसांना सांगितलेलं! राणेंकडून राजकोटवरील घटनाक्रम कथन
वाद नेमका काय?
माढ्याचे माजी खासदार आणि भाजपचे नेते रणजितसिंह नाईक यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या रामराजे नाईक निंबाळकरांनी लोकसभा निवडणुकीवेळी उघड भूमिका घेतली होती. २०१९ मध्ये माढ्यातून विजयी झालेल्या रणजितसिंहांना भाजपनं पुन्हा तिकीट दिलं. पण रामराजेंनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. उमेदवार बदला, अन्यथा प्रचार करणार नाही, अशी भूमिका रामराजेंच्या कार्यकर्त्यांनी घेतली. रामराजे निवडणुकीपासून तटस्थ राहिले. त्याचा फायदा शरद पवारांच्या उमेदवाराला झाला. धैर्यशील मोहिते पाटील तुतारी चिन्हावर निवडून आले.
Ajit Pawar: महायुतीत NCPच्या कार्यकर्त्यांना त्रास, रामराजेंची खदखद; अजितदादा म्हणतात, मोदी-शहांशी बोलेन
लोकसभेला पराभूत झालेले रणजितसिंह नाईक निंबाळकर आपल्या कार्यकर्त्यांना त्रास देत असल्याची रामराजेंची तक्रार आहे. भाजपनं याची दखल घ्यावी आणि कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांना सत्तेतून बळ देऊ नये, अशी रामराजेंची मागणी आहे. ‘आपण आपलं म्हणणं अजित पवारांकडे मांडू. आपली व्यथा त्यांना सांगू. विषय मार्गी लागला तर ठीक आहे. अन्यथा तुतारी हाती घ्यायला किती वेळ लागतो,’ असं सूचक विधान रामराजेंनी काल केलं होतं. त्यामुळे रामराजे लवकरच शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे.