Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अल्पवयीन गर्लफ्रेण्डसह अनिकेत पळाला, पोलिसांनी शोधून काढलं, ट्रेनने येताना संशयास्पद मृत्यू

5

Thane Youth Train Death: भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यातील पाच्छापूर येथील मृतक अनिकेत जाधव आणि शहापूर तालुक्यातील अल्पवयीन मुलगी या दोघांमध्ये प्रेम होतं.

हायलाइट्स:

  • पोलिसांच्या ताब्यात असताना प्रियकराचा धावत्या ट्रेनमधून पडून मृत्यू
  • मृत्यू प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह दोन अंमलदार निंलबीत
  • ठाणे शहापूर येथील धक्कादायक घटना
Lipi
प्रियकर प्रेयसी ताब्यात बॉयफ्रेंडचा मृत्यू
ठाणे (शहापूर) : २४ वर्षीय प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकाने वाशिंद पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीची दखल घेत पोलीस पथकाने प्रियकर आणि प्रेयसीचा शोध सुरू केला असता, एक महिन्याच्या तपासाअंती दोघे मध्यप्रदेश राज्यातील एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे समोर आले. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन राजधानी एक्सप्रेसने येत असतानाच प्रियकराचा धावत्या ट्रेनमधून पडून संशयास्पद मृत्यू झाला होता.या प्रकरणी पोलिसांनी त्याने ट्रेनच्या बोगीमधील टॉयलेटच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगितले. मात्र, प्रियकराच्या नातेवाईकांनी ग्रामीण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे आमचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात असताना त्याने आत्महत्या नव्हे तर त्याची हत्या झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस अंमलदार अशा तिघांना निलंबित करून त्यांची चौकशी सुरू केल्याने ठाणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अनिकेत जाधव (वय २४) असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
Mukesh Ambani:​ आशियातील धनाढ्य उद्योगपती ​मोठ्या धमाक्याच्या तयारीत, काय आहे मेगा प्लॅन? ​PhonePe, ​बँकांना धास्ती

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यातील पाच्छापूर येथील मृतक अनिकेत जाधव आणि शहापूर तालुक्यातील अल्पवयीन मुलगी या दोघांमध्ये प्रेम होतं. प्रेमातून त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला असता २५ जुलै रोजी दोघेही लग्न करण्याच्या उद्देशाने पळून गेले. मात्र, त्यावेळी मुलीचे अपहरण मृतक अनिकेत याने केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकाने वाशिंद पोलीस ठाण्यात दिली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने दोघांचा शोध सुरू केला असतानाच, ते महिनाभरापासून मध्यप्रदेश राज्यातील एका शहरात असल्याची माहिती वाशिंद पोलिसांना मिळाली. वाशिंद पोलिसांनी मध्यप्रदेशातील पोलिसांच्या मदतीने वाशिंद पोलीस आणि मुलीच्या नातेवाईकांनी मध्यप्रदेश येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या ठिकाणाहून अनिकेत आणि त्याच्यासोबत असलेल्या त्याची प्रेयसी या दोघांना २५ ऑगस्ट रोजी मध्यप्रदेश येथून ताब्यात घेऊन रेल्वेने महाराष्ट्र राज्यात आणण्यात येत होतं. राजधानी एक्सप्रेस ग्वालियर रेल्वे स्टेशननजीक असलेल्या मुराई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रेन येताच अनिकेत याने बोगीच्या टॉयलेटच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याचं पोलिसांनी त्यावेळी सांगितले. त्यामुळं त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद मुराई रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
UP News: आयुष्य संपवणार होती, फासाचा VIDEO सोशल मीडियावर, मेटा AI ची कमाल अन् तरुणीचा जीव वाचला

दरम्यान, अनिकेतचा मृत्यू हा पोलिसांच्या ताब्यात असताना झाल्याने अनिकेतच्या नातेवाईकांनी अनिकेतचा मृत्यू नव्हे तर त्याचा घातपात मुलीच्या घरच्यांनी केल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे पोलिसांच्या ताब्यात असतानाही अनिकेतचा रेल्वे अपघातात मृत्यू होणे एक संशयास्पद असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अनिकेतच्या कुटुंबियांनी केली. याबाबत सखोल चौकशी न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपाइंचे किरण चन्ने यांनी दिला होता.

या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन ठाणे ग्रामीण एसपी डॉ. स्वामी यांनी मृत अनिकेतला मध्यप्रदेश मधून ताब्यात घेणारे वाशिंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वांगड, पोलीस अंमलदार जोगदंड आणि चलवादी या तिघांना ३१ ऑगस्ट रोजी निलंबित करून त्यांची चौकशी सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बर्वे यांनी दिली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.