Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Pune Hadapsar Vasudev Kulkarni murder over wifi : हल्लेखोरांनी कुलकर्णींकडे इंटरनेट वाय-फाय मागितले होते. ते दिले नसल्याच्या रागातून हल्लेखोरांनी कुलकर्णींचा चेहरा छिन्नविच्छिन्न होईपर्यंत ठेचला.
या प्रकरणी विनायक रामचंद्र कुलकर्णी (वय ५१, रा. उत्कर्षनगर सोसायटी, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एक सज्ञान आणि तीन अल्पवयीन मुलांचा समावेश असून, मयूर भोसले (वय २०, रा. हडपसर, मूळ रा. फलटण) याला अटक केली आहे. तिघांना ताब्यात घेतले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाच्या घटनेनंतर १२ तासांच्या आत खुनाची दुसरी घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
Police Recruitment Success Story: जिथे वेटर म्हणून काम, तिथेच जाहीर सत्कार; दहा वर्षांच्या मेहनतीनंतर पोलिसात भरती, लेकाने नाव काढलं
काय घडलं त्या रात्री?
हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कुलकर्णी हे हडपसर गाडीतळ येथे हडपसर-सासवड रोडलगत उत्कर्षनगर सोसायटीत राहतात. ते फायनान्स कंपनी व बँकेचे काम करीत होते. सोमवारी रात्री दीड वाजता या सोसायटीसमोरील पदपथावर ते शतपावली करीत होते. इतक्यात चार मुले रस्त्याने जात असताना त्यांना मोबाइलचे वाय- फाय पाहिजे होते, म्हणून त्यांनी ते कुलकर्णींकडे मागितले.
Pune Hadapsar hotspot murder : रस्त्यात हॉटस्पॉट न दिल्याचा राग, पुण्यातील बँक कर्मचारी कुलकर्णींच्या हत्येचं गूढ उकललं
वाय-फाय देण्यास नकार
त्या वेळी कुलकर्णी यांनी अनोळखी मुलांना वाय-फाय देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले. नंतर मुलांनी रागाने त्याच्याकडील धारदार हत्याराने कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावर सपासप वार केले. चेहरा छिन्नविच्छिन्न होईपर्यंत ठेचला आणि आरोपी हल्ला करून फरारी झाले.
Lalbaug Bus Accident : गणराया काय केलंस? होणाऱ्या नवऱ्यासोबत बाईकवर जाताना बसची धडक, त्याच्याच डोळ्यादेखत प्राण सोडले
चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा
या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली आहे. हडपसर पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेजद्वारे चारही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिस तपासात चारही मुलांनी वाय-फाय दिला नसल्याच्या कारणाने हत्याराने वार केल्याची कबुली दिली. आरोपीमध्ये एक आरोपी सज्ञान असून, तीन आरोपी १७ वर्षांचे आहेत. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.