Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Vidhan Sabha Election Survey : मुंबईत महाविकास आघाडीला ३६ पैकी २१ विधानसभा मतदारसंघात विजय मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ज्येष्ठ सेफोलॉजिस्ट दयानंद नेने यांनी १६ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या काळात एक व्यापक सर्वेक्षण केले आहे. यानुसार लाडकी बहीण योजना महायुतीच्या बाजूने विजयाची मोठी लाट निर्माण करत नसल्याचे दिसते.
जनता काय म्हणते?
सर्वेक्षणात महायुतीच्या कामगिरीबद्दल विचारले असता, २८ टक्के जनतेने ती चांगली असल्याचे मत नोंदवले आहे, २० टक्क्यांनी समाधानकारक आहे, तर २० टक्के जनतेने खराब असल्याचं म्हटलं आहे, २१ टक्क्यांनी कामगिरी असमाधानकारक आहे, तर ११ टक्के लोकांनी माहिती नाही असे उत्तर दिले आहे.
हायकमांडचा होकार, काँग्रेसकडून विधानसभेचे ६ उमेदवार जाहीर, पाच जागांवर मैत्रीपूर्ण लढतही ठरली
दीड महिन्यात आकडे स्थिर
जुलै अखेरीस दयानंद नेनेंनी केलेल्या सर्वेक्षणात महाविकास आघाडीला १५८ तर महायुतीला १२२ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता दीड महिन्यानंतर झालेल्या दुसऱ्या सर्वेक्षणात अजूनही जनमानसात फारसा फरक झाला नसल्याचे समोर आले आहे. मविआच्या जागा सहाने घटून १५२ वर आल्या आहेत, मात्र महायुती अवघ्या एकाने वाढून १२३ वरच पोहोचली आहे.
मुंबईत ठाकरेंचाच आव्वाज? मविआची सरशी, महायुतीला मतं नाहीत फारशी, धोक्याची घंटा वाजवणारा सर्व्हे
मुंबईत महाविकास आघाडीचा आवाज
मुंबई आणि लगतच्या ठाणे, पालघर, तसेच पुणे यासारख्या जिल्ह्यांचा विचार करता आश्चर्यकारक आकडे समोर आले आहेत. मुंबईत महाविकास आघाडीला ३६ पैकी २१ विधानसभा मतदारसंघात विजय मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महायुतीला अवघ्या १५ च जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच मुंबई ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचीच राहण्याचे संकेत मिळतात.
देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का, समर्थक भाजप सोडण्याच्या तयारीत, काँग्रेस प्रवेशाचे संकेत
ठाणे-पुण्यात काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात महायुती आघाडी घेत १८ पैकी १२ जागा जिंकू शकते. तर मविआला पाच आणि इतरांच्या वाट्याला एक जागा येऊ शकते. पालघरमध्ये महायुतीचा सुपडा साफ होऊ शकतो. मविआ दोन, तर इतर चार जागा जिंकू शकतात. यात माकप किंवा बविआचा समावेश असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यात २१ पैकी १६ जागांवर महायुतीला यश मिळण्याची चिन्हं आहेत. तर मविआला ५ जागा मिळू शकतात.