Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
samarjit singh ghatge party entry programme : आज शरद पवार यांच्या नेतृत्वात कागलमधील गैबी चौकात समरजितसिंह यांचा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी भाषण करताना शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे.

सगळ्यांची घरं कुठे आहेत हे मला माहित आहे
जयंत पाटील यांनी भाषणाला सुरवात करताच मंत्री हसन मुश्रीफ यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ”सगळ्यांची घरं कुठे आहेत हे मला माहित आहे. काही गोष्टी घडत नसतात तर घडवाव्या लागतात. आज समरजित राजेंनी घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे. आजच्या प्रवेशाला शरद पवार आहेत इतकाच संदेश मतदारसंघासाठी महत्त्वाचा आहे. विकासासाठी राजेंनी तुतारी हातात घेतली. ही परिवर्तनाची सुरुवात आहे. महाराष्ट्रामधील जनता हुशार आहे. पवार कसं वातावरण बदलतात हे पाहून आमचे विरोधक बुचकळ्यात पडले असतील”.
शरद पवार वस्तादांचे वस्ताद आहे
जयंत पाटील पुढे म्हणाले की, ”शरद पवार वस्तादांचे वस्ताद आहेत. ते डाव राखून ठेवतात. मी माझ्या जाणाऱ्या सहकाऱ्यांना सांगत होतो शरद पवारांना डावलून जाऊ नका मोठं लफड होईल. मात्र, ते सरकारमध्ये जाऊन बसले. त्यांना सरकार मध्ये गेल्याने संरक्षण मिळेल त्यांना वाटल असेल. त्यामुळे सगळेच निघून गेले आम्ही काही जण राहिलो”.Sharad Pawar: पवारांनी डाव टाकला! घाटगेंना सोबत घेत भाजपला धक्का; ऐतिहासिक गैबी चौकात २ मोठ्या घोषणा
बच्चनच्या डायलॉगचा केला उल्लेख
जयंत पाटलांनी अमिताभ बच्चन यांच्या डायलॉगचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांना टोला मारला आहे. ते म्हणाले की, ”अभिताब बच्चन यांच्या डायलॉग प्रमाणे हम जहा खडे होते है, लाईन वाही से शुरू हो जाती है याप्रमाणे शरद पवार जहा खडे होते है लाईन वाही से शुरू हो जाती है. थोडा दिवस थांबा तुतारी आवाज सगळीकडे घुमेल”.
समरजित यांना निवडून आणायचे आहे
जयंत पाटील म्हणाले की, ”शाहू महाराज यांना निवडणून देऊन आपण परिवर्तन दाखवून दिलं आता समरजित राजेंना ही निवडून आणायचं आहे.
समरजितसिंह घाटगे यांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. त्यांची आजपर्यंतची कारकीर्द चांगली आहे. ते विरोधकांचा हिशोब चोख ठेवतील याचा आम्हाला विश्वास आहे”.
दरम्यान, घाटगे यांच्या प्रवेशामुळे महायुती विशेषत: भाजपला मोठा धक्का बसला आहे. तसेच अजित पवारांसामोर देखील मोठं आव्हान उभं राहिलं आहे.