Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ganeshotav 2024: ठाण्यात गणरायाच्या आगमन सोहळ्यांचा निनाद; गणेश मंडळांच्या जल्लोषात वाजतगाजत मिरवणुका
Ganeshotav 2024: मुंबईसह ठाण्यातही आता गेल्या काही वर्षांपासून आगमन मिरवणूक सोहळा पार पडत असून तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात बाप्पाच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमते. या मिरवणुकांमधून गणरायाचा नाद निनादात असल्याने भक्तिमय वातावरणात सर्वसामान्य दंग होत आहेत.
ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला समाज प्रबोधनपर देखाव्यांसोबत देखण्या गणेश मुर्त्यांची परंपरा आहे. काही वर्षांपूर्वी वागळे इस्टेट परिसरातील गणेश मंडळांमध्ये विराजमान होणाऱ्या उंचचउंच मुर्त्या आणि या मुर्त्यांचे आगमन सोहळे गणेश भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत होत्या. आता मात्र वृंदावन, कोपरी, पोखरण रोड या भागात विराजमान होणाऱ्या उंच मुर्त्या आणि त्यांच्या आगमन मिरवणूकाही गणेश भक्तांना खुणावतात. वेगवेगळ्या रूपांमधील गणेश मुर्त्या पाहण्यासाठी आणि आगमन सोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वसामान्य उत्सुक असतात. या मिरवणुकांमध्ये होणारे ढोल-ताशा पथकांचे वादन, लाईट शो, मान्यवरांची उपस्थिती नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. हे सोहळे निर्विघन पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क राहावे लागते.
छायाचित्रकारांना अनोखी संधी
आगमन सोहळ्यांमधील गर्दी टिपण्यासाठी हौशी छायाचित्रकारांना मोठी पर्वणी असते. बाप्पाच्या विविध मुर्त्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी छायाचित्रकार या आगमन सोहळ्यात आघाडीवर असतात. या सोहळ्याचे व्हिडीओ, रिल्स आणि शॉर्ट्सच्या माध्यमातून गणेश मंडळ समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
आर्थिक उलाढालीची गणिते
आगमन सोहळ्यांकरिता आकर्षक टीशर्ट, टोप्या, बॅनर आणि फटाक्यांची आतषबाजी यातून मोठी आर्थिक उलाढालही होते. यासोबत विविध प्रायोजकांच्या जाहिराती मिरवणूक सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतात. ही आर्थिक गणिते उत्सवाच्या भव्यतेसाठी पाठबळ देतात.
Ganeshotav 2024: उत्सवाला महागाईचे चटके! मोदक, लाडू, मिठाईसह सुक्या मेव्यांच्या दरांत ३० टक्के वाढ, असे आहेत दर
‘या’ मंडळांच्या गणेश मुर्त्यांचे आगमन
– ठाण्याचा महाराजा, बाल मित्र गणेशोत्सव मंडळ, किसननगर : १
– वृंदावनचा महागणपती, वृंदावन गणेशोत्सव मंडळ, वृंदावन सोसायटी
– वागळेचा राजा, जय बजरंग बाल मित्र मंडळ, किसननगर : ३
– वागळेचा विघ्नहर्ता, बाल मित्र मंडळ, श्रीनगर
– कोपरीचा महाराजा, ठाणे सार्व. गणेशोत्सव मंडळ, सिद्धार्थ नगर, कोपरी
‘या’ मंडळांच्या आगमन सोहळ्यांची प्रतीक्षा
३ सप्टेंबर : श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, श्रीरंग सोसायटी
४ सप्टेंबर : ठाण्याचा राजा, नरवीर तानाजी सार्व. गणेशोत्सव मंडळ, पाचपाखाडी
५ सप्टेंबर : काजूवाडीचा राजा, काजूवाडी – वैतीनगर रहिवासी मित्र मंडळ, काजूवाडी