Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कळवा रुग्णालयाबाहेरच महिलेची प्रसूती; एक बाळ दगावले, दुसरे सुखरुप, कुटुंबीयांचा निष्काळजीचा आरोप

17

Kalwa Hospital Thane: घरी गेल्यावर पुन्हा पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात आल्यानंतर येथील आवारात गाडीमध्ये महिलेची प्रसूती झाली. यावेळी एका बालकाचा रुग्णालयाबाहेरच प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला.

हायलाइट्स:

  • गाडीत जन्म दिलेल्या बाळाचा मृत्यू, दुसरे बाळ सुखरूप
  • कुटुंबीयांचा रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीचा आरोप
महाराष्ट्र टाइम्स
kalva hospital
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाबाहेर मंगळवारी सकाळी एका महिलेची प्रसूती झाल्याचा प्रकार घडला. या घटनेत एका नवजात बालकाचा मृत्यू झाला. पोटात दुखू लागल्याने ही गर्भवती महिला रुग्णालयात पहाटे चारच्यादरम्यान आली होती. मात्र तिला रुग्णालयात दाखल करून न घेता घरी पाठवण्यात आले. घरी गेल्यावर पुन्हा पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात आल्यानंतर येथील आवारात गाडीमध्ये महिलेची प्रसूती झाली. यावेळी एका बालकाचा रुग्णालयाबाहेरच प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. तर दुसऱ्या बालकाची प्रसूती रुग्णालयात करण्यात आली. ते नवजात अर्भक सुखरूप असून रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीमुळेच आमच्या एका बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.काय घडलं?

कळवा पूर्व येथील ओतकोनेश्वर नगर भागात राहणाऱ्या महिलेचे प्रसूतीसाठी कळवा रुग्णालयात नोंदवले होते. याच रुग्णालयात तिच्या नियमित तपासण्या सुरू होत्या. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास पोटात दुखू लागल्याने ती रुग्णालयात आली. मात्र तिला रुग्णालयात दाखल करून न घेता पुन्हा घरी पाठवण्यात आले. प्रसूतीची वेळ अद्याप आली नसल्याचे सांगत तिला घरी पाठवण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मात्र घरी गेल्यावर या महिलेला पोटात पुन्हा दुखू लागल्याने सकाळी तिला खासगी वाहनाने नातेवाईकांनी पुन्हा रुग्णालयात आणले. वाटेत वाहतूककोंडी असल्याने रुग्णालयात पोहचण्यास उशीर झाला. त्यामुळे रुग्णालयाच्या बाहेरच तिची प्रसूती झाली. गाडीतच तिने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर या महिलेला तातडीने रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात नेण्यात आले. याठिकाणी तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. मात्र गाडीत प्रसूती झालेल्या अर्भकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर दुसरे बालक व्यवस्थित असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली.
अतिघाई संकटात नेई! लवकर काम संपविण्याच्या नादात गेला २० वर्षीय तरुणाचा जीव, सातपूरमध्ये हळहळ
संबंधित महिला ही आठ महिन्याची गर्भवती होती. त्यामुळे तिची प्रसूतीची वेळ आली नव्हती. ती सकाळी नऊच्या सुमारास येथे आली, तेव्हा तिची रुग्णालयाच्याबाहेरच प्रसूती झाली. रुग्णालयाच्या वतीने तातडीने या महिलेला शस्त्रक्रिया विभागात नेऊन तिच्यावर उपचार सुरु केले. यामध्ये एका बालकाचे वजन १. ४ किलो असल्याने ते फार अशक्त होते. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या बालकाचे वजन दोन किलोपेक्षा जास्त असल्याने हे बाळ सुखरूप आहे.– डॉ. अनिरुद्ध माळगावकर, वैद्यकीय अधीक्षक, कळवा रुग्णालय
किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.