Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गणेशोत्सवासाठी कोकणात जायचंय? ही बातमी जरुर वाचा, कोकण अन् मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

9

Ganeshotsav Konkan Railway Timetable: कोकणात जाणाऱ्या रेल्वेचं आरक्षण पूर्ण झाले आहे. यामुळे विघ्नहर्त्याचे स्वागत करण्यासाठी खरेदी आणि गावी निघालेल्या मुंबईकरांना प्रवासात त्रास सहन करतच जावे लागणार आहे.

हायलाइट्स:

  • गणेशोत्सावाच्या आधीच प्रवाशांच्या पदरी निराशा
  • पण कोकण आणि मध्य रेल्वेचा मोठा निर्णय
  • विशेष अनारक्षित रेल्वेगाडीची घोषणा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
कोकण रेल्वे गणेशोत्सव अनारक्षित गाड्या
महेश चेमटे, मुंबई : येत्या आठवडाअखेरीस घरोघरी बाप्पा विराजमान होणार असल्याने उत्सवातील खरेदीसाठी बाजारपेठा ग्राहकांसाठी सज्ज आहेत. मात्र, याचदरम्यान, उत्सवात कोकणात जाण्यासाठी प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे. कोकणात जाणाऱ्या रेल्वेचं आरक्षण पूर्ण झालं आहे. मात्र, कोकणकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष अनारक्षित रेल्वेगाडीची घोषणा कोकण आणि मध्य रेल्वेने केली आहे. शनिवारी ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. अनेक मुंबईकरांनी संभाव्य गर्दीचा त्रास टाळण्यासाठी शनिवारीच खरेदीला सुरूवात केली. यामुळे दादर, भुलेश्वर, माटुंगा, क्रॉफर्ड मार्केट अशा सर्वच ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी उसळली आहे. मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वेच्या कुर्ला ते वाशीदरम्यान मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेसाठी ३५ दिवसांचा ब्लॉक सुरू आहे. यामुळे खरेदीसाठी निघालेल्या प्रवाशांचे ब्लॉकमुळे मेगाहाल होण्याची शक्यता आहे.
Sunil Shelke : दादांचे आमदार सुनील शेळकेंचा मोठा डाव, काँग्रेस एकनिष्ठ गळास लावला, मावळमध्ये ‘हाता’वर ‘घड्याळ’ भारी

गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष अनारक्षित रेल्वेगाडीची घोषणा कोकण आणि मध्य रेल्वेने केली आहे.

१) गाडी क्र. ०११०३ / ०११०४ मुंबई सीएसएमटी – कुडाळ – मुंबई सीएसएमटी विशेष (अनारिक्षित):

गाडी क्रमांक ०११०३ मुंबई सीएसएमटी – कुडाळ विशेष (अनारिक्षित)
सीएसएमटी येथून ४ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल. कुडाळला गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११०४ कुडाळ – मुंबई सीएसएमटी विशेष (अनारिक्षित)
-कुडाळ येथून ५ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी पहाटे ०४:३० वाजता सुटेल आणि सीएसएमटीला त्याच दिवशी दुपारी ४.४० वाजता पोहोचेल.

थांबे – दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामठे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, आणि सिंधुदुर्ग.

डबे – एकूण २० = सामान्य – १४ डबे,स्लीपर – ०४, एसएलआर -०२

प्रवास कसा करायचा ?

मुंबईहून कोकणात जाण्यासाठी रेल्वे-एसटींचे आरक्षण पूर्ण झाल्याने प्रवाशांकडून खासगी बसकडे विचारणा सुरू झाली आहे. खासगी बस चालकांकडून एसटीच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट भाड्यांची आकारणी होत असल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या गर्दीचा हंगाम असल्याचे सांगत बस चालकांकडून तिकीट दर वाढीला समर्थनच देण्यात येत आहे. एसटी नाही, रेल्वे नाही, खासगी गाडीचे वाढीव दर परवडत नाही, मग उत्सव काळात प्रवास कसा करायचा, असा प्रश्न प्रवाशांचा आहे

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.