Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Kiran Gaikwad to join NCP : काँग्रेसचे डॉ. किरण शंकरराव गायकवाड हे सुनील शेळके यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत
सुरुवातीपासूनच किरण गायकवाड हे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले नेते आहेत. किरण गायकवाड यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे मावळमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. किरण गायकवाड लवकरच घड्याळ हाती घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईत ठाकरेंचाच आव्वाज? मविआची सरशी, महायुतीला मतं नाहीत फारशी, धोक्याची घंटा वाजवणारा सर्व्हे
कोण आहेत किरण गायकवाड?
संपूर्ण गायकवाड कुटुंब हे काँग्रेसशी सुरुवातीपासूनच एकनिष्ठ राहिले आहेत. किरण गायकवाड हे देखील काँग्रेसशी एकनिष्ठ होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते राजकारणामध्ये सक्रिय नव्हते. किरण गायकवाड यांनी मावळ विधानसभा निवडणूक देखील लढवलेली आहे. त्यांच्या पत्नी शुभांगी गायकवाड या संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालिका आहेत. किरण गायकवाड हे सध्या मावळ वार्ता फाउंडेशन या सामाजिक संस्थेमध्ये सक्रिय असून मराठा आंदोलनाबाबत देखील ते आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते.
Sharad Pawar : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? शरद पवारांचं थेट उत्तर, आमची सत्ता येईल पण…
किरण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये असताना नॅशनल स्टुडेंट युनियन ऑफ इंडियाचे शहराध्यक्षपद, मावळ तालुका युवक अध्यक्ष पद, तालुका अध्यक्षपद, जिल्हा सरचिटणीसपद या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत. तसेच २०१४ साली त्यांनी विधानसभेची निवडणूक देखील लढवलेली आहे.
Sunil Shelke : दादांचे आमदार सुनील शेळकेंचा मोठा डाव, काँग्रेस एकनिष्ठ गळास लावला, मावळमध्ये ‘हाता’वर ‘घड्याळ’ भारी
किरण गायकवाड हे काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. ते गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय नव्हते. मात्र आमदार सुनील शेळके यांच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून ते पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सुनील शेळके यांनी मावळमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पाडल्याची चर्चा देखील पाहायला मिळत आहे. लवकरच ते सुनील शेळके यांच्यासोबत जाणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश केला जाणार असल्यास चर्चा आता सुरू झाल्या आहेत.