Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Kagal Vidhan Sabha Nivadnuk : ‘आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार आपसे बैर नही. लेकिन समरजीत तेरी खैर नही.’ असा नारा हसन मुश्रीफ यांनी दिला.
हसन मुश्रीफ काय म्हणाले?
मी अनेकदा सांगितले आहे, की लोकशाहीत एखाद्या वक्तीचे वय २५ वर्षांच्या वर झाले, की तो निवडणूक लढवू शकतो. आता तर सात पक्ष झाले आहेत, त्यामुळे उमेदवारांची मांदियाळी झाली आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले. ते काय म्हणतात माहिती नाही. पण पवार साहेब माझे दैवत आहेत. पवार साहेब माझ्या मागे का लागले आहेत, हे मला कळत नाही. ते माझ्यासारख्या अल्पसंख्यांकांच्या मागे का लागत आहेत? असा मनातला प्रश्न मुश्रीफ यांनी बोलून दाखवला.
प्रजा जिंकली पाहिजे
माझ्या सहा निवडणुकांमध्ये शरद पवार आले, ते नेहमी म्हणायचे की राजा विरोधात प्रजा जिंकली पाहिजे. तेच मी पुन्हा म्हणत आहे, की प्रजा जिंकली पाहिजे. निवडणुकीत शरद पवार आपसे बैर नही. लेकिन समरजीत तेरी खैर नही, असंही मुश्रीफ म्हणाले.
माझे म्हणणे काय आहे, की जयंत पाटील साहेब आले होते. तेव्हा प्रवेश झाला नाही. साहेब आले तेव्हा प्रवेश झाला. माझ्या सारख्या अल्पसंख्याक माणसाच्या मागे का लागता? ही निवडणूक नायक विरूद्ध खलनायक अशी असेल, असे मुश्रीफ म्हणाले.
शरद पवार, आपसे बैर नहीं… लेकिन समरजीत तेरी खैर नहीं.. मुश्रीफांचा नारा, म्हणतात साहेब माझ्या मागे का लागलेत?
जिथे जागा रिक्त आहेत तिकडे अनेक जण जात आहेत. गेल्या वेळी सुद्धा प्रयत्न झाला होता. पण मेहुणे पाहुणे समजवण्या पलिकडे आहेत. त्यासाठी निवडून यावे लागते, बहुमत लागते, असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला.
Sunil Shelke : दादांचे आमदार सुनील शेळकेंचा मोठा डाव, काँग्रेस एकनिष्ठ गळास लावला, मावळमध्ये ‘हाता’वर ‘घड्याळ’ भारी
समरजितसिंहांनी तुतारी फुंकली
कागल विधानसभा मतदारसंघात तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी महायुतीबाहेर पडत पक्षाला रामराम ठोकला. कालच त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात विधानसभेची ‘तुतारी’ फुंकली. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा हाती धरला.
Sharad Pawar : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? शरद पवारांचं थेट उत्तर, आमची सत्ता येईल पण…
कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना, ज्या भागात ज्यांचं काम आहे त्यांचं मत जाणून घेणार असल्याचं सांगितलं होतं. नागरिकांमध्ये ज्यांच्याबद्दल सकारात्मक भावना आहे त्यांचं स्वागत आहे. आता कागलमध्ये समरजित घाटगे यांची गरज विधानसभा मतदार संघात आहे, कागलच्या जनतेच्या डोळ्यात मला समरजित यांच्याबाबत भावना समजत होती, असं म्हटलं होतं.