Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राष्ट्रवादीने ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीतून ‘मुख्यमंत्री’च वगळलं, शिंदेसेना नाराज

12

Maharashtra Ladki Bahin Yojna Ad Controversy : ‘माझी लाडकी बहीण योजना – महिन्याला दीड हजार रुपये, दादाचा वादा लाभ आणि बळ’ असा उल्लेख करत जाहिरातीत अजित पवार यांचा फोटो वापरण्यात आला होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेचं श्रेय घेण्यावरुन महायुतीतील घटकपक्षांत चढाओढ निर्माण झाल्याचं चित्र आहे. कारण ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या जाहिरातीतून अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने ‘मुख्यमंत्री’ हा शब्दच वगळला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी पसरली आहे. ‘माझी लाडकी बहीण योजना – महिन्याला दीड हजार रुपये, दादाचा वादा लाभ आणि बळ’ असा उल्लेख करत जाहिरातीत अजित पवार यांचा फोटो वापरण्यात आला होता.

राष्ट्रवादीचा दावा काय?

राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना म्हटले, की केंद्रातही काही योजना पंतप्रधानांच्या नावे असतात, तशा राज्यात काही योजना मुख्यमंत्र्यांच्या नावे असतात. परंतु ‘लाडकी बहीण’ हा योजनेच्या नावाचा शॉर्टफॉर्म जनतेपर्यंत लवकर पोहोचावा आणि समजावा यासाठी तसा उल्लेख केला होता.
Ladki Bahin Yojna: बायको एक, पण ‘लाडकी बहीण योजने’चे ७८ हजार मिळवले, साताऱ्याच्या नवरोबाने कशी लढवली नसती अक्कल?
अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडताना लाडकी बहीण योजना सांगितली होती. जर त्यांना श्रेय घ्यायचंच असतं, तर त्यांनी तेव्हाच त्याला ‘उपमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ असं म्हटलं असतं. राज्य सरकारच्या वतीने बजेटमध्ये ज्या योजना मांडल्या, त्यातील काहींना मुख्यमंत्र्यांचं नाव दिलं जातं. अजित दादांच्या अर्थ विभागानेच ते नाव दिलं, त्यावेळी त्यांचा दुसरा विचार असता तर अन्य कोणाची नावं दिली असती. कार्यकर्त्यांच्या फॉर्म आणि सरकारी योजनेतही तेच अधिकृत नाव आहे, याकडे उमेश पाटलांनी लक्ष वेधलं.

मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात आणि त्यांच्या नावाने योजना असल्याबाबत दुमतच नाही. मात्र आमच्या पक्षाचा जनसंवाद दौरा हा संभाव्य उमेदवार किंवा आमदार असलेल्या मतदारसंघात सुरु आहे. तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी बोर्डावर काय लिहिलं, याला महत्त्व नाही, असं स्पष्टीकरण उमेश पाटील यांनी दिलं.
‘त्या’ महिलांना लाडकी बहीण योजनेच्या ३ हजार रुपयांना मुकावे लागणार, अदिती तटकरेंची माहिती

शिवसेनेची नाराजी का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार, संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, की नाव वगळण्यावरुन नाराजी नाही पण महायुतीत काही वाद आहेत, असे गैरसमज पसरु नयेत, याची काळजी घ्यायला हवी. कार्यकर्त्यांच्या मनात आपल्या नेत्याविषयी आदर असला पाहिजे, पण योजना किंवा घोषणेला सर्वांनी मिळून साथ द्यायला हवी, असं शिरसाट म्हणाले.

Ladki Bahin Yojna : राष्ट्रवादीने ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीतून ‘मुख्यमंत्री’च वगळले, शिंदेसेना नाराज

अर्थमंत्री किंवा गृहमंत्री यांचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतो. तेही ‘एकनाथ शिंदे माझी लाडकी बहीण योजना’ असं म्हणू शकले असते. परंतु श्रेय हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचंही आहे, इतकंच काय कॅबिनेटमधील इतर मंत्र्यांचंही आहे, कारण सगळे मिळून बैठकीत एखाद्या प्रस्तावाला मंजुरी देतात. त्यामुळे आपला नेता अडचणीत येऊ नये किंवा इतरांना त्याविषयी गैरसमज पसरवायला वाव मिळू नये, याची कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी. तुमच्या भागात या योजनेची जाहिरात करताना अजित दादांचा मोठा फोटो लावा, परंतु योजनेच्या नावात बदल केला तर गैरसमज पसरतो, अशी भूमिका संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.