Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राष्ट्रवादीच्या मतदारसंघात काँग्रेस नेत्याचे बॅनर, पर्वतीच्या जागेवरून मविआत रस्सीखेच

10

Pune Parvati Assembly Constituency: ‘जनतेच्या मनातील आमदार, आपल्या आबांचे काम दमदार…, आबा बागुल यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा’ अशा आशयाचे फ्लेक्स संपूर्ण पर्वती विधानसभा मतदारसंघात लागले आहेत.

हायलाइट्स:

  • राष्ट्रवादीच्या मतदारसंघात काँग्रेस नेत्याला विधानसभेसाठी शुभेच्छाचे बॅनर
  • पर्वती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये नवा पेच
  • काँग्रेस नक्की काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष
Lipi
पर्वती विधानसभा मतदारसंघ
अभिजीत दराडे, पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रोज नवनवे पेच प्रसंग निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता पर्वती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत नवा पेच निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आपण पर्वती विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणारच असल्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे पारंपारिक राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसची ही जागा असल्याने आता महाविकास आघाडीमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये थेट आबा बागुल यांना विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देणारे फ्लेक्स लागल्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. ‘जनतेच्या मनातील आमदार, आपल्या आबांचे काम दमदार…, आबा बागुल यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा’ अशा आशयाचे फ्लेक्स संपूर्ण पर्वती विधानसभा मतदारसंघात लागले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) मधून पर्वती विधानसभा मतदारसंघाची जागा लढवण्यासाठी अश्विनी कदम आणि सचिन तावरे या दोघांनीही कंबर कसली आहे. मात्र आता या बॅनरबाजीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पर्वतीची जागा नक्की कुणाची यावरून वाद होण्याची शक्यता आहे.
शरद पवार, आपसे बैर नहीं… लेकिन समरजीत तेरी खैर नहीं.. मुश्रीफांचा नारा, म्हणतात साहेब माझ्या मागे का लागलेत?

२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसच्या अश्विनी कदम यांनी लढवली होती. त्यावेळेस देखील राष्ट्रवादीने ही जागा आपल्याला सोडावी, अशी मागणी काँग्रेसने आबा बागुल यांच्यासाठी केली होती. मात्र त्यावेळेस ही जागा राष्ट्रवादीने सोडण्यास नकार दिला होता. पण आता आबा बागुल यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचाच निर्धार केल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये आबा बागुल यांना पुणे लोकसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी हवी होती. पण पक्षाने रवींद्र धंगेकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर आबा बागुल हे पक्षावर नाराज झाले होते. त्यांनी काँग्रेस भवन या ठिकाणी या निषेधार्थ आंदोलन देखील केलं होतं. आबा बागूल यांची नाराजी दूर करण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. माजी राज्यमंत्री रमेश बागवे, तसेच माजी आमदार उल्हास पवार हेही त्यांच्या समवेत होते. ‘पक्ष सोडून जाऊ नका, प्रचारात सक्रिय व्हा, तुमच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ’ असे थोरात यांनी बागूल यांना सांगितले होते. बाळासाहेब थोरात यांच्या या शब्दावर आबा बागुल यांनी काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय होऊन रवींद्र धंगेकर यांचा प्रचार केला. मात्र आता आबा बागुल निवडणूक लढवण्याच्याच मानसिकतेत असल्याने काँग्रेस नक्की काय निर्णय घेणार याकडे आबा बागुल यांच्यासह शहराचं लक्ष लागलं आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.