Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शिंदेसेनेचा ‘भाजप पॅटर्न’; मोठ्या भावाला त्याच्याच स्टाईलनं उत्तर; ‘नवी’ खेळी करत दे धक्का

8

Maharashtra Politics: लोकसभेला जागावाटपावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बराच संघर्ष करावा लागला. बरीच वाटाघाटी करुन त्यांनी १५ जागा पदरात पाडून घेतल्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
नवी मुंबई: लोकसभेला भाजपपेक्षा चांगला स्ट्राईक रेट राखणाख्या शिंदेसेनेनं आता भाजपला नामोहरम करण्याची तयारी सुरु केली आहे. लोकसभेला भाजपनं अंतर्गत सर्वेक्षणांचा हवाला देत शिंदेसेनेच्या अनेक जागांवर दावा सांगितला. काही जागांवर शिंदेंना जाहीर केलेले उमेदवार बदलायला लावले. पण शिंदेंनी वाटाघाटीत १५ जागा पदरात पाडून घेत ७ जागा जिंकल्या. पण २८ जागा लढवणाऱ्या भाजपला केवळ ९ जागांवर यश मिळावलं.

लोकसभेला अवघ्या ९ जागा मिळाल्यानं भाजप बॅकफूटवर गेला आहे. आता भाजपच्या नाकीनऊ आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मित्रपक्षाचाच पॅटर्न वापरण्यास सुरुवात केली आहे. २०१९ मध्ये शिवसेनेनं जिंकलेल्या, पक्षफुटीनंतरही शिंदेंकडे असलेल्या अनेक जागांवर भाजपनं लोकसभेच्या जागावाटपात दावा सांगितला. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत शिंदेंना बरेच परिश्रम करावे लागले. महत्प्रयासानं त्यांनी १५ जागा मिळवल्या. लोकसभेवेळी भाजपनं वापरलेला पॅटर्न आता शिंदेसेनेनं वापरण्यास सुरुवात केली आहे.
Nagpur-Goa Expressway: लोकसभेला फटका, विधानसभेचा धसका; महायुती सरकारनं ८६ हजार कोटींचा ड्रीम प्रोजेक्ट गुंडाळला
नवी मुंबईतील बेलापूर, ऐरोलीच्या जागेवर शिंदेसेनेनं थेट दावा सांगितला. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. मंदा म्हात्रे बेलापूरचं, तर गणेश नाईक ऐरोलीचं प्रतिनिधीत्व विधानसभेत करतात. या दोन्ही आमदारांमध्ये विस्तवही जात नाही. नाईक आणि म्हात्रे यांच्यात अधूनमधून खटके उडत असल्यानं नवी मुंबई भाजपमध्ये संघर्ष सुरु असतो. त्यात आता शिंदेंनी भाजप पॅटर्न वापरुन नवी मुंबईत नवी खेळी केल्यानं भाजपची गोची झाली आहे.
Nitesh Rane: नितेश राणेंनी कुर्ल्यातील मशिदीत येऊन दाखवावं! भाजपच्याच नेत्याचं थेट चॅलेंज, राणे म्हणतात..
शिंदेसेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विजय चौगुलेंनी बेलापूर, ऐरोलीच्या जागांवर दावा सांगितला आहे. स्वत: चौगुले ऐरोलीतून लढण्यास उत्सुक आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. जागावाटपाबद्दल पक्षानं निर्णय घेतल्यावर पुढील रणनीती ठरवू, असं चौगुले म्हणाले आहेत. ते शिंदेंचे निकटवर्तीय मानले जातात. ‘२०१९ मध्येही आम्हाला दोन्ही जागा लढवायच्या होत्या. आमची तशी तयारी होती. पण मी माघार घेतली,’ असं चौगुले म्हणाले.

Vidhan Sabha Nivadnuk: शिंदेसेनेचा ‘भाजप पॅटर्न’; मोठ्या भावाला त्याच्याच स्टाईलनं उत्तर; ‘नवी’ खेळी करत दे धक्का

चौगुले आणि नाईक कुटुंबात विळा भोपळ्याचं नातं आहे. ऐरोलीतून निवडणूक लढण्यास चौगुले उत्सुक आहेत. २००९ मध्ये हा मतदारसंघ अस्तित्त्वात आला. तेव्हापासून तो नाईक कुटुंबाच्या ताब्यात आहे. २००९ आणि २०१४ मध्ये गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ऐरोलीतून विजयी झाले. दोन्ही वेळा त्यांनी विजय चौगुले यांचाच पराभव केला. त्यावेळी चौगुले एकसंध असलेल्या शिवसेनेचे उमेदवार होते. चौगुले यांचा दोन्ही वेळा १० हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.