Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Viral Video : सिंगापूर दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी वाजवला ढोल, सोशल मीडियावर व्हिडिओला पसंती

6

PM Modi : ब्रुनेईला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूरला पोहोचले आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनी नृत्य आणि संगीताने स्वागत केले. यावेळी पीएम मोदी यांनी सुद्धा ढोल वाजवण्याचा आनंद घेतला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
सिंगापूरमध्ये पंतप्रधान मोदींनी ढोल वाजवला
मुंबई : ब्रुनेईच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत. तेथील भारतीयांनी नृत्य आणि संगीत सादरीकरणासह मोदींचे जोरदार स्वागत केले. पीएम मोदी खुद्द ढोल वाजवत कार्यक्रमात सामील झाले तर स्थानिक महिलांनी लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य सादर केले. X सोशल मीडियावरील संदेशात, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सिंगापूर भेटीबद्दलचा अनुभव शेअर केला आहे. “सिंगापूरला पोहोचलो. भारत-सिंगापूर मैत्री वाढवण्याच्या उद्देशाने विविध बैठका घेणार आहोत.” असे मोदी ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

पीएम मोदी यांच्या व्हिडिओवर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ट्वीट करत कौतुक केले आहे. सिंगापूरमध्येही महाराष्ट्राची संस्कृती आणि सणाचा उत्साह जाणवतोय, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजी सुद्धा या जल्लोषात सहभागी झाले आहेत. एकही बीट न चुकवता उत्तम प्रकारे ढोल वाजवला अशी प्रतिक्रिया ट्वीटवरुन फडणवीसांनी दिली आहे.
सिंगापूरमध्येही जेव्हा महाराष्ट्राचा उत्साह, संस्कृती आणि सणाचा उत्साह जाणवतो, तेव्हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यात सामील होतात, एकही थाप न चुकवता उत्तम प्रकारे ढोल वाजवतात!
दोन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यात पंतप्रधान मोदी त्यांचे समकक्ष लॉरेन्स वोंग यांची भेट घेणार आहेत. ही पंतप्रधान मोदींची पाचवी सिंगापूर भेट आहे आणि २०१८ नंतरची त्यांची पहिली भेट आहे. या व्यतिरिक्त, PM मोदी स्थानिक व्यावसायिक नेत्यांसह व्यावसायिक गोलमेजमध्ये सहभागी होतील आणि परदेशी कंपन्यांच्या प्रतिनिधींना भेटतील. सिंगापूर दौऱ्यात पंतप्रधान मोदी संरक्षण, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, अंतराळ तंत्रज्ञान, आरोग्य, क्षमता बांधणी, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि लोकांशी संवाद यासह विविध क्षेत्रांवर द्विपक्षीय चर्चा करतील. या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधी शोधण्यावर त्यांचे लक्ष असेल.
Bacchu Kadu : राजकोट किल्ल्यावर जाऊन पंतप्रधान मोदी, फडणवीसांनी उठाबशा काढाव्यात, बच्चू कडूंची टीका

पंतप्रधानांचा ब्रुनेई दौरा कसा होता?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ब्रुनेई येथील भारतीय उच्चायुक्तालयाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले, भारतीय पंतप्रधानांनी दक्षिणपूर्व आशियाई देशाला दिलेली पहिली द्विपक्षीय भेट होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. ब्रुनेईचा सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्या निमंत्रणावरून मोदींचा हा दौरा भारत आणि ब्रुनेई यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या ४० वर्षांच्या मैत्रीपूर्ण वधार्पनदिनानिमित्त पार पडला.

Viral Video : सिंगापूर दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी वाजवला ढोल, सोशल मीडियावर व्हिडिओला पसंती

पंतप्रधान मोदी आणि ब्रुनेईचा सुलतान यांची पहिली भेट नोव्हेंबर २०१४ मध्ये नेपिडाव येथे २५ व्या आसियान शिखर परिषदेदरम्यान झाली होती. मनिला येथे झालेल्या २०१७ पूर्व आशिया शिखर परिषदेत ते पुन्हा एकत्र आले. जानेवारी २०१८ मध्ये, ब्रुनेईच्या सुलतानने ASEAN-भारत स्मारक शिखर परिषदेसाठी इतर नऊ ASEAN राज्यांच्या नेत्यांसह भारताला भेट दिली. हे नेते २६ जानेवारी २०१८ रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात “मुख्य पाहुणे” म्हणून देखील हजर होते.

प्रतीक्षा बनसोडे

लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.