Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Jalgaon Crime News: चुंबळे या साळवा तालुका धरणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका होत्या. त्या एप्रिल २०२३मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर मुलगा समीर देशमुख यांच्याकडे नाशिकला वास्तव्यास होत्या.
हायलाइट्स:
- बँकेतून ३० लाख रोख काढले
- सोबत असलेल्या सहकाऱ्यानेच हत्या केली
- जळगावमध्ये महिलेची हत्या करत मृतदेह तापीत फेकला
Share Market Down: 3 लाख कोटी पाण्यात… सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेपुढे मंदीचा धोका, शेअर बाजाराची पुन्हा निसरडी पायवाट
सदर महिलेचा मृतदेह अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र, या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपींनी महिलेकडून लुटलेले ३० लाख रुपये तसेच ज्या चारचाकी वाहनामध्ये त्या महिलेचा खून केल्याचा संशय आहे, ती चारचाकी देखील जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चुंबळे या साळवा तालुका धरणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका होत्या. त्या एप्रिल २०२३मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर मुलगा समीर देशमुख यांच्याकडे नाशिकला वास्तव्यास होत्या. १७ ऑगस्ट रोजी सोसायटीच्या सभेसाठी त्या जळगावला आल्या होत्या. २० ऑगस्ट रोजी त्यांनी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास पती संजय देशमुख यांना फोन करून रात्री नाशिक स्टेशनवर घ्यायला येण्यास सांगितले. मात्र, त्या रात्री पोहोचल्या नाहीत. दोन दिवस शोध घेतल्यावर त्यांच्या मुलाने जळगाव तालुका पोलीस ठाण्याला २२ ऑगस्ट रोजी हरवल्याची तक्रार नोंदवली.
महिलेचं लोकेशन पारोळापर्यंत
पोलिसांनी संबंधित महिलेच्या लोकेशनची माहिती घेतली. त्यात २० ऑगस्ट रोजी पारोळापर्यंतचे लोकेशन आढळून आले. त्यानंतर मात्र लोकेशन दिसून येत नाही. त्यामुळे महिलेचा मोबाईल हा पारोळ्यात फेकला की मग तेव्हाही महिलेलाही पारोळात आणले होते का? याबाबतची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.
Today Top 10 Headlines in Marathi: संपामुळे लालपरीची चाकं थांबली, लाडक्या बहिणीची ओवाळणी कशी लांबवली? सकाळच्या दहा हेडलाईन्स
महिलेचा मृतदेह मात्र सापडेना
पोलिसांच्या माहितीनुसार फ्लॅट घेण्यासाठी महिलेला ३० लाख रुपये काढायचे होते. हे सोबत असलेल्या जिजाबराव पाटील याला माहिती होते. सोबतच कामाला असल्याने महिलेसोबत तो पैसे काढायला गेला होता. फ्लॅट घेताना कॅश रक्कम दिली तर फ्लॅट कमीमध्ये मिळेल असं सांगत जिजाबराव याने महिलेचा विश्वास जिंकला. त्यानंतर त्या पैशांसाठी महिलेचा खून केल्यानंतर महिलेचा मृतदेह तापी नदीत फेकून दिला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयतांनी महिलेसोबत रिंग रोडवरील बँकेतून ३० लाखाची रक्कम काढल्यानंतर त्यांच्या कारमध्ये बसवले. त्यानंतर महिलेला घरी सोडले नाही तर गाडीतच महिलेचा गळा आवळून खून केला. त्यानंतर महिलेचा मृतदेह शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील तापी नदीच्या पुलावरून नदीत फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि पोलीस पोहोचले संशयितापर्यंत
मयत महिलेच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार महिलेला नाशिकला फ्लॅट घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी ३० लाखाची रक्कम २० ऑगस्ट रोजी रिंग रोडवरील बँकेतून काढली होती. याच माहितीच्या आधारावर तालुका पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या फुटेजमध्ये स्नेहलता यांच्यासोबत जिजाबराव पाटील हे आढळून आले. जिजाबराव हे साळवा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात लिपिकाचे काम करतात. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता स्नेहलता चुंबळे यांना खोटे नगर स्टॉपजवळ सोडल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी त्यानंतर जिजाबराव पाटीलचे फोन कॉल डिटेल्स तपासले. त्यातून जिजाबरावने विजय निकम याच्याशी सर्वाधिक संपर्क केल्याचे स्पष्ट झाले. त्यातून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर दोघांनीही खुनाची कबुली दिल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली आहे.