Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Rahul Gandhi: काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी सांगलीत आलेल्या राहुल गांधीनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरुन राज्य सरकार आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे.
सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यांत कोसळला. त्यावरुन राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण मोदींच्याच हस्ते झाला. पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारवर टीकेची झोड उठली. त्यानंतर महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या मोदींनी माफी मागितली. तोच धागा पकडत राहुल गांधी मोदींवर तुटून पडले.
जयदीप आपटेंना बॉसही वाचवू शकला नाही, अटकेच्या ८ दिवसाआधीच ठाण्यातून जामिनाची तयारी, संजय राऊत यांचा आरोप
‘मी शिवाजी महाराजांची माफी मागतो, असं मोदी म्हणाल्याचं माझ्या वाचनात आलं. त्यांनी माफी नेमकी का मागितली? त्यामागची कारणं काय? ती वेगवेगळी असू शकतात. संघाच्या माणसाला कंत्राट दिलं म्हणून त्यांनी माफी मागितली का? कंत्राट मेरिटवर द्यायला हवं असं त्यांना वाटत असेल.
दुसरा मुद्दा भ्रष्टाचार, चोरीचा असू शकतो. त्यामुळे त्यांनी माफी मागितली असेल. ज्याला कंत्राट दिलं, त्यानं भ्रष्टाचार केला, याबद्दल मोदींनी माफी मागितली का? तिसरा मुद्दा हलगर्जीपणाचा असू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषाची मूर्ती उभारताना इतकीही काळजी घेतली गेली नाही की ती उभी राहील? कदाचित या भावनेतून मोदींनी माफी मागितली असेल, अशा शब्दांत राहुल गांधींनी माफीबद्दल तीन प्रश्न विचारले.
Rahul Gandhi: मोदींनी माफी नेमकी कशासाठी मागितली? राहुल गांधींचे तीन सवाल; भलीमोठी यादीच वाचली
छत्रपती शिवरायांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे पडतो. या सरकारनं शिवरायांचा अपमान केला आहे. त्यामुळे मोदींनी केवळ शिवरायांची नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रत्येकाची माफी मागावी, अशी मागणी राहुल यांनी केली. मोदी नेमकी कशा कशाबद्दल माफी मागणार आहेत? देशातील सगळी कंत्राटं ते केवळ दोन माणसांनाच देतात. त्याबद्दल ते माफी मागणार का? शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आणले. त्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांपैकी ७०० जणांचा जीव गेला. त्याबद्दल मोदी माफी मागणार का? नोटबंदी, चुकीच्या जीएसटीमुळे छोटे, मध्यम उद्योग उद्ध्वस्त झाले. अनेकांचा रोजगार गेला. त्याबद्दल मोदी माफी मागणार का, अशी प्रश्नांची सरबत्तीच राहुल यांनी केली.