Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
nitesh rane statement : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी नितेश राणे यांना इशारा दिला आहे. मशिदीमधून घुसून मारतो म्हणणाऱ्या नितेश राणे यांनी मशिदी समोरील रस्त्यावर येऊन दाखवावे असा इशारा जुबेर बागवान यांच्याकडून देण्यात आला आहे.
नितेश राणेंमुळे अजित पवारांना सुद्धा फटका बसणार
काही दिवसांपूर्वी भाजप आमदार नितेश राणे यांनी श्रीरामपूर येथे एका भाषणादरम्यान वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे आता महायुतीमधील घटक पक्षांना सुद्धा ही बाब खटकण्यास सुरू झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील सोलापुरातील नेते जुबेर बागवान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही इथं सर्व समाजातील जनतेला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहोत,आणि महायुती मधील नेते नितेश राणे हे मुस्लिम समाजाबद्दल असे विधान करत आहेत. नितेश राणें यांच्या वक्तव्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फटका बसणार आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाज महायुती विरोधात मतदान करेल. असं म्हणत राणेंवर टीका केली आहे.
Ravindra Dhangekar: कसब्यात ‘धंगेकर पॅटर्न’ला जाणार तडा? स्वपक्षातील अंतर्गत वादामुळे विधानसभेची वाट बिकट
अन्यथा राष्ट्रवादी महायुतीमधून बाहेर पडणार
जुबेर बागवान यांनी महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडे नितेश राणेंना भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करा अशी विनंती केली आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमधून बाहेर पडेल असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.
भाजपवर अजित पवार पहिलेच नाराज
साताऱ्यातील फलटण तालुक्यात पार पडलेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांवरून आपली नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, ”राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धमक्या देणे, भीती दाखविणे तसेच कार्यकर्ते फोडून भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून घेणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. याची आपण गांभीर्याने नोंद घेऊन भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींशी चर्चा करणार आहोत. आपण कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत हा दादाचा वादा आहे”, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली दिली होती.