Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आदित्य ठाकरेंमुळे सेनेत काम केले, आमदार देशमुखांच्या उद्धट वागणुकीमुळे पक्ष सोडते : खुशी भटकर

10

UBT Shivsena : आमदार देशमुख यांच्या उद्धट वागणुकीमुळे पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत युवासेनेच्या पदधिकारी खुशी भटकर यांचा पत्रकार परिषदेत सदस्यपदाचा राजीनामा जाहीर केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आमदार नितीन देशमुख यांच्यावर खुशी भाटकर
अकोला, प्रियंका जाधव : शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना युवती आघाडीच्या अधिकारी प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती खुशी भटकर यांनी दिली आहे. आमदार नितीन देशमुख यांच्यावर उद्धट वागणुकीचा गंभीर आरोप करीत आपण आपल्या युवासेना युवती अधिकारी प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचं खुशी प्रशांत भटकर यांनी ५ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. यावेळी खुशी भटकर यांनी आमदार नितीन देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. जिल्ह्यात पक्षात महिलांना सन्मान मिळत नसल्याचा गंभीर आरोपही भटकर यांनी केला.

पत्रकार परिषदेत भटकर म्हणाल्या, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या २०१९ मध्ये घेतलेल्या ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमामुळे प्रभावित होत आपण पक्ष कार्याला सुरुवात केली होती. तेव्हापासून आजपर्यंत पक्षात अनेक युवतींचे पक्ष प्रवेश घडवून आणले असल्याची माहिती खुशी भटकर यांनी दिली. पक्ष कार्यात सदैव अग्रेसर असल्याने पक्षाने गत वर्षी त्यांना जिल्हा युवती अधिकारी प्रमुख पदाची जबाबदारी देण्याचे काम मुंबईहून घोषित केली होते. त्यानुसार त्यांचाकडे बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, बार्शीटाकळी आणि अकोट या तालुक्याची जबाबदारी सुद्धा दिली. यादरम्यान आपण पक्षात अनेक युवतींचे प्रवेश करुन घेतले आणि पक्ष संघटन मजबूत करण्याचे कार्य केले असल्याचा दावाही यावेळी खुशी भटकर यांनी केला.

दरम्यान हे सर्व अगदी सुरळीत पणे सुरू असताना मात्र गत आठवड्यात युवासेनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य धनश्री कोलगे या अकोल्यात आढावा बैठकीकरिता आल्या होत्या. यावेळी आमदार नितीन देशमुख व अन्य पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय विश्रागृहावर त्यांचे आगमन झाल्यावर त्यांच्या स्वागतासाठी जात असताना आमदार देशमुख यांनी स्वागत करण्यापासून रोखत म्हणाले, “की तुझे वडील इतर पक्षातील नेत्यांसोबत राहतात आणि तू आमची जिल्हाप्रमुख म्हणून कार्य करते हे योग्य नाही असा आरोपही त्यांनी केला. तुला कोणी ओळखत नाही. आमच्यामुळे तुझी ओळख निर्माण झाली आहे. तसेच तुझे या पक्षात काय काम आहे हे मला अद्यापही दिसले नाही.” असे म्हणत सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यासमोर अपमानित केलं असल्याचं भटकर यांनी म्हटलं. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य कोलगे यांनी आमदारांना थांबविण्याचा प्रयत्न केला तरी मात्र ते थांबले नाही त्यांनी बोलणे सुरूच ठेवले. सदर प्रकार हा अतिशय निंदनीय असून पक्षात अश्या प्रकारे महिलांसोबत वर्तन योग्य नाही. सर्वांसमोर हा विषय मांडत आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आमदारांनी केला असल्याचा गंभीर आरोपही भटकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

प्रतीक्षा बनसोडे

लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.