Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अनिल देशमुख यांच्या शक्ती कायदा तत्काळ लागू करावी अशी मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. यापुढे बदलापूरसारखी घटना घडू नये म्हणून तत्काळ पावले उचलावी, असेही अनिल देशमुख म्हणाले.
गृहमंत्री असताना महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली. विधानसभेतही मंजूर झाला. अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला पण, ३ वर्षांपासून प्रलंबित आहे. केंद्रात तुमचे सरकार असल्याने कायद्यास मंजुरी मिळवून आणा, असे आवाहनही अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले.
बदलापूर येथे चिमुकलीवर अत्याचार झाल्यानंतर सरकारने प्रकरण दाबण्यासाठी ४-५ दिवस प्रयत्न केले. नंतर जनतेला कळले की शाळेचे व्यवस्थापन भाजपशी संबंधित आहे, असा आरोपही त्यांनी केला. महिलांना अधिक सुरक्षित वाटावे, यासाठी तातडीने शक्ती कायदा राज्यात अंमलात आणावा. यापुढे बदलापूरसारखी घटना घडू नये म्हणून तत्काळ पावले उचलावी, असेही अनिल देशमुख म्हणाले. आंदोलनात शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी आमदार प्रकाश गजभिये, रमण ठवकर, जानबा मस्के, नूतन रेवतकर, अविनाश गोतमारे, शैलेंद्र तिवारी, रेखा कृपाले, वर्षा श्यामकुळे आदी सहभागी झाले होते.
शक्ती विधेयकातील काही तरतुदी
– १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप
– बलात्कारप्रकरणी अजामीनपात्र गुन्हा, दुर्मीळात दुर्मीळ प्रकरणात फाशीच्या शिक्षेची तरतूद
– ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दंड
– सामूहिक बलात्कार करणाऱ्यांना २० वर्षे कठोर जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद किंवा मरेपर्यंत जन्मठेप
– गुन्हा नोंद केल्यापासून ३० दिवसांच्या आत तपास पूर्ण करणे पोलिसांना बंधनकारक