Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विधानसभेच्या तोंडावर मिऱ्या एमआयडीसी वादाच्या फेऱ्यात, अधिसूचनेवरुन शिवसेना भाजप आमने-सामने

7

Shivsena BJP Controversy over Mirya MIDC: कोकणात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मतदारसंघात विकासकामांचा धूमधडाका लावला आहे. परंतु निवडणुकीच्या तोंडावर मिऱ्या एमआयडीसीच्या अधिसूचनेवरुन शिवसेना भाजपमध्ये रणकंदन सुरू झाले आहे.

Lipi
प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मतदारसंघात विकासकामांचा धूमधडाका लावला आहे. यातच निवडणुका तोंडावर असताना शिवसेना भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी ‘चला रत्नागिरीचा विकास करूया’ असा नारा देत रत्नागिरी फोरमची स्थापना केली आहे, या माध्यमातून त्यांनी एक प्रकारे उदय सामंत यांना शह देण्यासाठी उघडपणे भूमिका घेतल्याचे दिसते. रत्नागिरी येथील मिऱ्या एमआयडीसीवरून भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी ‘मला प्रसंगी पक्ष सोडावा लागला तरी चालेल’ अशी उघडपणे सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. ‘मिऱ्या एमआयडीसी भूसंपादनाच्या नोटिसा बजावणारे सरकार बदललं की, नोटीस रद्द होतील’ अशा स्वरूपाचे खळबळजनक विधान करत सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.

भाजपाचे माजी आमदार बाळा माने यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिऱ्या एमआयडीसीच्या भूसंपादनाबद्दल नाराजी व्यक्त करणारे पत्र पाठवलं होतं. मात्र त्याला अद्याप प्रतिसाद न मिळाल्याने बाळ माने यांच्या मनात नेमकं चाललंय काय? अशाही चर्चा रंगल्या आहेत.

बाळ माने यांची आक्रमक भूमिका

मिऱ्या एमआयडीसी वरून शिवसेना भाजपमध्ये रणकंदन सुरू झाले आहे. चार दिवसांपूर्वी मिऱ्या ग्रामस्थांची ग्रामदेवतेच्या मंदिरात बैठक घेऊन बाळ माने यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. येथे कोणते उद्योग येणार आहेत, काय होणार आहे, कोण उद्योजक आहेत, हे त्यांच्याजवळ बसून केवळ आम्ही ग्रामस्थच ठरवू. मात्र एमआयडीसीने अधिसूचना काढून ग्रामस्थांना नोटीसा बजावू नयेत व ग्रामस्थांनी त्या नोटिसा स्वीकारू नयेत आणि स्वीकारल्या तरी काही फरक पडत नाही, असा आदेशच दिला आहे. लवकरच विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बदलेल आणि आपलं सरकार येईल किंवा कोणतंही येऊद्यात नोटिसा बजावणारे हे सरकार बदललं की नोटिसा रद्द होतील, असेही सूचक विधान बाळ माने यांनी केलं आहे. एक प्रकारे मिऱ्या एमआयडीसी अधिसूचना रद्द करा असा अन्यथा तशीच काही वेळ आली तर प्रसंगी मी पक्ष सोडण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असं ग्रामसभेत सांगत भाजप पक्षश्रेष्ठीनाही सूचक इशारा दिला आहे.
जयदीप आपटेंना बॉसही वाचवू शकला नाही, अटकेच्या ८ दिवसाआधीच ठाण्यातून जामिनाची तयारी, संजय राऊत यांचा आरोप
तसेच बाळ माने यांनी ‘आमचं सरकार आहे, सरकारमध्ये आमचे १०५ आमदार आहेत त्यामुळे ४० आमदारांमध्ये समावेश असलेल्यांनी आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय याबद्दल परस्पर निर्णय घेऊ नये, असे म्हणत एकप्रकारे मंत्री उदय सामंत यांना टोला लगावला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर मिऱ्या एमआयडीसीवरून वातावरण तापले आहे. तर ‘लॉजिस्टिक पार्कच्या नावाखाली विकासाचे जे स्वप्न दाखवले जाणार आहे, ते आम्हाला नको आहे. आमचा विकास करताना परस्पर कोणतेही उद्योग करू दिले जाणार नाहीत, अशी विरोधी भूमिका घेत माने यांनी तुम्हाला विकास करायचा आहे. तर तो भगवती बंदराचा करा, असेही मानेंनी सरकारला सुचवले आहे.

जोर जबरदस्तीने एमआयडीसी होणार नाही- उदय सामंत

दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अलीकडे झालेल्या एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितले की, जर का कोणाला एमआयडीसी नको असेल तर जोर जबरदस्तीने केली जाणार नाही आणि आम्हाला असे एमआयडीसी करण्याची गरजही नाही. यामध्ये जणू काही उदय सामंत जमिनी घेऊन येथे महाल बांधणार आहे, अशा स्वरूपाचे उद्योग निवडणुकीच्या तोंडावर काही जणांकडून सुरू आहेत. मिऱ्या येथील आमच्या जमिनी घ्या, असं सांगायला माझ्याकडे कोण आलं होतं? असं सांगितलं तर यांची पळता भुई थोडी होईल, अधिसूचना निघाली म्हणजे त्याठिकाणी एमआयडीसी झाली, असं होत नाही, असा उदय सामंत यांनी बाळ मानेंवर पलटवार केला. तसेच रत्नागिरीतील पर्यटन उद्योगाला चालना मिळावी, रोजगार निर्मिती गावातच व्हावी, या उद्देशाने आपली मिऱ्या एमआयडीसी बाबत भूमिका असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

मिऱ्या एमआयडीसीची अधिसूचना

राजापूर पाठोपाठ मिऱ्या येथील सडामिऱ्या-जाकीमिऱ्या येथील खासगी क्षेत्र पोर्ट औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. यासाठी मिऱ्या येथील खाजगी क्षेत्रास महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१चे प्रकरण ६ च्या तरतूदी लागू केल्या आहेत. सदरचे क्षेत्र कलम २ खंड (ग) नुसार अधिसूचित करण्याचा प्रस्तावास अधिनियमाच्या कलम ३२(१) पुर्वी खालील अटीच्या अधीन राहून क्षेत्र अधिसूचित करण्यास शासन मंजूरी दिली आहे. या जागेवर विविध वस्तूंच्या स्टोरेज, व्यवस्थापन, वितरण आणि वाहतुकीसाठी या क्षेत्राचा विकास होणार असून हे लॉजिस्टिक पार्क म्हणून विकसित होणार आहे, तेथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. यासाठी मीडिया परिसरात जमीन अधिग्रहण करून एमआयडीसीचा प्रस्ताव असला तरीही यावरून वातावरण तापले आहे. आता बाळ माने यांच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र शासन कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.