Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

३० लाखांमुळे सहकाऱ्यानेच कांड केला, महिलेची कारमध्ये हत्या, मोठी अपडेट समोर

7

Jalgaon News: नाशिक येथे मुलाकडे राहत असलेल्या निवृत्त परिचारिका स्नेहलता चुंबळे २० ऑगस्ट रोजी या जळगावला सोसायटीच्या सभेला आल्यानंतर बेपत्ता होत्या. त्यांची २२ ऑगस्ट रोजी तालुका पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली.

हायलाइट्स:

  • अटकपूर्व जामिनासाठी काढून ठेवले प्रत्येकी सव्वा सव्वा लाख रुपये
  • पोलिसांची सहानुभूती मिळावी म्हणून पायाला बांधला पाटा
  • जळगावातील निवृत्त महिला परिचारिका हत्या प्रकरण
Lipi
निवृत्त महिला परिचारिका हत्या
निलेश पाटील, जळगाव : जळगावातील सेवानिवृत्त महिला परिचारिका स्नेहलता चुंबळे (वय ६०) हत्या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. महिलेसोबत पैसे काढायला गेलेल्या सहकाऱ्यानेच संबंधित महिलेची कारमध्ये गळा आवळून हत्या केली. फ्लॅटसाठी ही महिला बॅंकेत ३० लाख रुपये काढायला गेली होती. त्यांच्यासोबत त्यांचा सहकारी जिजाबराव देखील होता. पैसा बघितल्याने त्याचे डोळे फिरले आणि त्याने हे धक्कादायक कृत्य केलं. या प्रकरणी पोलिसांनी जिजाबराव आणि त्याचा सहकारी विजय निकम यांना अटक केली आहे. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आपल्याला अटक होऊ शकते अशी शक्यता दोन्ही आरोपींना होती. त्याआधीच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रत्येकी सव्वा सव्वा लाख रुपये त्या ३० लाखातून काढून ठेवले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सर्व पुरावे पोलिसांनी जमा करायला सुरुवात केली आहे. ३० लाख रुपयांसाठी सेवानिवृत्त परिचारिका स्नेहलता चुंबळे (रा.खोटेनगर) यांच्या हत्येचा हा पूर्वनियोजित कट असल्याचं समोर येत आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी करायची आणि घटनेनंतर आपल्याला अटक होऊ शकते अशी कुणकुण लागताच दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रत्येकी एक लाख ३० हजार रुपये वकिलांसाठी काढून ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे.
Jalgaon Crime News: निवृत्त परिचारिकेसोबत जाऊन ३० लाख रुपये काढले, साथीदाराचे डोळे फिरले, कारमध्ये बसवलं अन्…

हत्या करणारे दोन्ही सरकारी नोकर

नाशिक येथे मुलाकडे राहत असलेल्या निवृत्त परिचारिका स्नेहलता चुंबळे २० ऑगस्ट रोजी या जळगावला सोसायटीच्या सभेला आल्यानंतर बेपत्ता होत्या. त्यांची २२ ऑगस्ट रोजी तालुका पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करत असताना ३० लाखांसाठी हत्या करणारा जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कनिष्ठ लिपिक जिजाबराव पाटील आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लिपिक विजय निकम यांनी रचलेला कट समोर आला आहे. दरम्यान, मृत महिलेचा मृतदेह अद्याप सापडलेला नाहीय.

निवृत्त परिचारिकेसोबत आपण आहे हे कुणाला समजू नये म्हणून दोघांनी महामार्गावरून जाताना टोल नाकाही चुकवला. त्यानंतर अमळनेर तालुक्यातील आर्वी मार्गे ते शिरपूरकडे गेले. मात्र, ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते कैद होत गेले. पोलिसांनी तोच धागा पकडत त्यांना पकडलं. ही हत्या जिजाबराव पाटील याच्या कारमध्ये करण्यात आल्याने ती गाडी जप्त होऊ नये म्हणून पाटील याने दुसरे जुने वाहन दाखविण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांसमोर त्याचा प्लॅन फसला.

सहानुभूती मिळावी म्हणून पायाला पाटा

जिजाबराव पाटील आणि विजय निकम यांना तालुका पोलिसांनी चौकशीनंतर सोडल्यावर त्यांना एलसीबीकडून चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. पोलिसांकडून सहानुभूती मिळावी म्हणून विजय निकम याने अमळनेर येथील राहत्या डॉक्टरला तीन हजार रुपये देऊन पायाला फॅक्चर नसताना पाटा बांधून घेतला होता.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.