Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Nagpur Accident: नागपूर-उमरेड मार्गावर ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात; विद्यार्थ्यासह चौघे ठार, २३ जखमी

14

Nagpur Accident: ट्रकमध्ये रेशनचे धान्य होते. चालक रवी वाघमारे हा रस्त्याच्या बाजूला ट्रक उभा करून श्रमिकांची वाट बघत होता. याचदरम्यान नागपूरहून मूलकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने ट्रकला मागेहून ट्रकला धडक दिली.

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : नागपूरहून उमरेडकडे जाणारी माँ दुर्गा कंपनीची भरधाव ट्रॅव्हल्स (एमएच ४९ जे ८६१६) उभ्या ट्रकवर (एमएच ३१ एपी २९६६) आदळल्यानंतर पानठेल्यावर धडकून शेतात घुसली. या भीषण अपघातात कालवा निरीक्षक, विद्यार्थ्यासह ४ जण ठार झाले; तर २३पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास उमरेड मार्गावरील भिवापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तास परिसरात घडली. या घटनेने उमरेड मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

नेमकं काय घडलं?
कालवा निरीक्षक जसवंत वसंतराव बावणकर (वय ५५, रा. नागभिड), संजय योगेश्वर सोनकुसरे (वय ४८, रा. शांतीनगर), सुरेखा अंकुश ठवरे (वय ४२, रा. नाड शिवणफड, ता. भिवापूर), विद्यार्थी नैतिक जितेंद्र मडावी (वय १४, रा. कन्हाळगाव, ता. सिंदेवाही), अशी मृतकांची नावे आहेत. जखमींमध्ये वंदना देवचंद नैताम (वय २३, रा. चिकमारा, सिंदेवाही), प्रिया नंदलाल पटेल (वय २१, रा. सिंदेवाही), आरुषी अभय गजघाटे (वय १७, रा. नागपूर), अनुराग महादेव सलोरे (वय २२, रा. नागभिड), रवी मोतीराम वाघमारे (वय ४५, रा. भीमादेवी रोड, भिवापूर), पौर्णिमा धुरवास निकुरे (वय २५, रा. आवडगाव, ता. नागभिड), प्रमोद मारुती शिंगेवार (वय ५३, रा. सिंदेवाही), सुदाम उटूजी मेश्राम (वय ६८, रा. सिंदेवाही), शालिक अर्जुन कुंभरे (वय ३५, रा. चंद्रपूर), समिक्षा वसंता धारणे (वय १७, रा. भिवापूर), अल्केश श्यामसुंदर तिवाडे (वय ४५, रा. उमरेड), मारुती जुनोजी लांजेवार (वय ६०, रा. नागपूर), प्रणित दिवाकर दिल्वार (वय ३७, रा. नागपूर), शोभा रामकृष्ण गजभिये (वय ६०, रा. नागभिड), राजू राजेंद्र थूल (वय ४९) आणि अन्य यांचा समावेश आहे. त्यांच्यावर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

ट्रकमध्ये रेशन धान्य
ट्रकमध्ये रेशनचे धान्य होते. चालक रवी वाघमारे हा रस्त्याच्या बाजूला ट्रक उभा करून श्रमिकांची वाट बघत होता. याचदरम्यान नागपूरहून मूलकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने ट्रकला मागेहून ट्रकला धडक दिली. त्यानंतर पानठेल्यावर आदळून ट्रॅव्हल्स शेतात घुसली. यात ट्रकचालक रवी हा जखमी झाला.

‘बहिणीं’ना घेऊन जाणारा बसचालक नशेत; ऑटोरिक्षाला धडक, महिलेने घेतली उडी; नागपुरातील थरारक घटना
खासगी ट्रॅव्हल्सवर नियंत्रण कुणाचे?
अनेक ट्रॅव्हल्सकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येते. एका ठिकाणाहून निघाल्यानंतर ट्रॅव्हल्स थेट निर्धारित ठिकाणीच थांबायला हवी, असा नियम आहे. मात्र, या नियमाचे पालन होत नाही. नागपूर बसस्थानक परिसरातून निघालेली ट्रॅव्हल्स आधी भांडेप्लॉट चौक, दिघोरी चौक व प्रवाशाने हात दाखविला त्या ठिकाणी थांबते. या ट्रॅव्हल्सवर आरटीआचे नियंत्रण आहे. परंतु, आरटीओने याकडे दुर्लक्ष केले आहे. वाहतूक पोलिसांचाही कानडोळा असून, दुचाकी वाहनचालकांवरील कारवाईवरच त्यांचा भर असतो. अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचाही बोले पेट्रोप पंप चौक, रविनगर चौकातही अशाचप्रकारे ट्रॅव्हल्स थांबा आहे. यावरही ना आरटीओचे ना पोलिसांचा ‘अंकुश’ आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.