Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबईतील टाइम्स टॉवरला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

9

Frire Breaks Out At Times Tower: मुंबईतील कमला मिल्स परिसरातील टाइम्स टॉवर इमारतीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Lipi
मुंबई: मुंबईच्या वरळी परिसरातील टाइम्स टॉवरमध्ये भीषण आग लागल्याची माहिती आहे. कमला मिल्स परिसरातील टाइम टॉवर या इमारतीला ही आग लागली आहे. सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे, सध्या यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग का लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

कमला मिल्स कम्पाऊण्डमधील टाइम्स टॉवर इमारतीला भीषण आग

लोअर परळ भागातील कमला मिल्स कम्पाऊण्ड येथे टाइम्स टॉवर ही कमर्शिअल इमारत आहे. या इमारतीला सकाळी साडे सहाच्या सुमारास आग लागल्याची घटना घडल्याची माहिती आहे. आगीने रौद्ररुपर धारण केल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. आगीची तीव्रता पाहता अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

इमारतीत अधिक लोक अडकल्याची शक्यता फार कमी, अग्निशमन दलाकडून सर्च ऑपरेशन सुरु

शुक्रवारी (६ सप्टेंबर) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. टाइम्स टॉवर ही कमर्शिअल इमारत असून यामध्ये रहिवासी कोणीही नाही. त्यामुळे आतमध्ये जास्त लोक अडकल्याची शक्यता फार कमी आहे. तरीही सध्या शोधकार्य आणि मुख्यकरुन ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

आग नियंत्रणात आहे, आग पूर्णपणे विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आग ही नियंत्रणात आहे, ती वाढत नाहीये. पण, ज्याठिकाणी ही आग लागली आहे, त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीमुळे धुराचे मोठे लोट परसत आहेत. त्यावरही नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.