Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विनेश फोगाट राजकीय आखाड्यात, तर मुंबईतल्या टाइम्स टॉवरला आग

6

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी

१. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाने हुलकावणी दिलेली कुस्तीगीर विनेश फोगाट आणि कुस्तीगीर बजरंग पुनिया विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. काँग्रेसच्या तिकिटावर विनेश हरयाणा विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे समोर आले आहे. चरखी दादरी, बाढ़डा किंवा जुलाना यापैकी एका मतदारसंघातून विनेश निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत. तर बजरंगला स्टार प्रचारक केले जाण्याची शक्यता आहे. विनेश आणि बजरंग आज सकाळी काँग्रेसचा झेंडा हाती घेणार आहेत. बातमी वाचा सविस्तर…
२. ‘लाडकी बहीण’ योजनेवरून राज्यभरात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच या योजनेच्या श्रेयवादावरून गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतच जोरदार वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ऐवजी ‘माझी लाडकी बहीण योजना’ हे नाव वापरण्यात येत असल्याबद्दल शिवसेनेने तीव्र आक्षेप नोंदवला.

३. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतील घटकपक्ष शिवसेना-भाजपच्या विचारधारेशी जुळवून घेण्याबाबत भाष्य करताना धर्मनिरपेक्षतेच्या वचनाशी कटिबद्ध असल्याचं निक्षून सांगितलं. युती असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांशी कधीही तडजोड करणार नाही, असं अजित पवार यांनी ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल, असं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं.

४. भाजपच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसत आहे. आम्हाला आमची महायुती टिकवायची आहे, कुणी चुकलं असेल तर त्यालाही सोबत घेऊन जायचंय, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं. तर शिवसेना आमदार ज्यावेळी गुवाहाटीला गेले होते, त्यावेळी उद्धव ठाकरेंचा मला फोन आला होता, असा जुना किस्सा कदमांनी गणपती बाप्पाची शपथ घेत सांगितला.

५. मुंबईच्या वरळी परिसरातील टाइम्स टॉवरमध्ये भीषण आग लागल्याची माहिती आहे. कमला मिल्स परिसरातील टाइम टॉवर या इमारतीला ही आग लागली आहे. सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे, सध्या यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. बातमी वाचा सविस्तर…

६. गणेशोत्सवात गर्दीच्या वेळी रस्ते बंद करण्यात येतात. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) बसच्या मार्गांमध्ये बदल करण्यात येणार आहे. सात ते १७ सप्टेंबर या कालावधीत पर्यायी मार्गावरून बस धावणार आहेत. सायंकाळी पाच वाजता मध्यवर्ती भागातील रस्ते बंद झाल्यानंतर बस मार्गात बदल होणार आहे. ६३ मार्गावरील चार हजार ३९६ फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.

७. बीड पोलीस ठाणे हद्दीत काही दिवसापूर्वी भोळसर अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा एका ११ वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना समोर आल्याने पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. बातमी वाचा सविस्तर…

८. रेणुकास्वामीच्या हत्येप्रकरणी अभिनेता दर्शन थुगुदीपा आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल झाल्याच्या एका दिवसानंतर, गुरुवारी सोशल मीडियावर एक छायाचित्र समोर आले. यात रेणुकास्वामी आपला जीव वाचवण्याची विनंती करताना दिसत आहे.

९. नेत्रहीन कपिल परमारने गुरुवारी पुरुषांच्या पॅरा ज्युदोमध्ये J1 60 किलो गटात भारताचे पहिले पॅरालिम्पिक पदक जिंकले. 24 वर्षीय परमार याआधी उपांत्य फेरीत इराणच्या एस बनिताबा खोर्रम आबादीकडून 0-10 असा पराभूत झाला होता. जे खेळाडू अंध आहेत किंवा कमी दृष्टी आहेत ते पॅरा ज्युडोमध्ये J1 श्रेणीत सहभागी होतात. यासह पदकांची संख्या आता 25 झाली आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी जिंकलेली ही सर्वाधिक पदकांची संख्या आहे.

१०. खासगी क्षेत्रात नोकरी करणारे पगारदार कर्मचारी अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करुन निवृत्तीसाठी मोठ्या प्रमाणात बचत करण्याचा प्रयत्न करतात. आजच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत त्यामुळे काय म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतात तर काही इतर सरकारी योजनांमध्ये कोणताही रिस्क न घेता दीर्घकाळासाठी गुंतवणुकीला प्राधान्य देतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.