Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ठाण्यात पुन्हा भीषण अपघात, भरधाव बस दुभाजकाला धडकली, मोठी दुर्घटना टळली

8

Thane ST Bus Accident: सुदैवाने अपघात झाला तेव्हा बसमध्ये प्रवासी नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

हायलाइट्स:

  • ठाण्यात घोडबंदर रोडवर पुन्हा अपघात
  • एसटी बस चढली थेट पुलाच्या दुभाजकावर
  • सुदैवाने कोणतीही जिवितहानी नाही
Lipi
ठाणे घोडबंदर एसटी बस अपघात
प्रदिप भणगे, ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अपघात, रस्त्यांची कामे तसेच अपुऱ्या वाहतूक उपाययोजना यामुळे नागरिकांना प्रचंड मन:स्तापाला सामोरे जावे लागत आहे. आज शुक्रवारी सकाळी पुन्हा अपघाताचा फटका नागरिकांना सहन करावा लागला. ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने एसटी बस वाहतूक करत होती. बसगाडी मानपाडा उड्डाणपूलाजवळ आली असता, उड्डाणपूलाच्या कठड्याला बस धडकली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बसमध्ये प्रवासी नसल्याचे पोलिसांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच पातलीपाडा येथे असेच दोन अपघात अवजड वाहनांचे झाले होते. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सुदैवाने अपघात झाला तेव्हा बसमध्ये प्रवासी नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. तर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. बसमधील चालक आणि वाहक देखील सुखरुप आहेत. ही बस नंदुरबार डेपोतील असल्याचं सांगण्यात येत आहे. ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेला जाताना ही घटना घडली आहे.
MP News: सहा पानी पत्र, गर्लफ्रेण्डसह तिच्या भावावर गंभीर आरोप, २३ वर्षीय तरुणाचा हादरवणारा अंत

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी या मार्गावर असाच एक भीषण अपघात झाला होता. ठाण्यातील घोडबंदर रोडवर नवी मुंबईहून पंजाबच्या दिशेने जाणाऱ्या केमिकलनी भरलेला ट्रक पलटी झाला होता. या घटनेमुळे काही वेळासाठी रस्ता बंद करण्यात आला होता. दुर्घटनाग्रस्त ट्रकमध्ये Aqueous Ammonia Solution नावाचे केमिकल होते. जे नवी मुंबईहून पंजाबच्या दिशेने नेण्यात येत होते.

दुर्घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. गंभीर चालकाला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कंटेनर पलटी झाल्यामुळे ट्रकमध्ये असलेले केमिकल रस्त्यावर सांडलं गेलं होतं. पोलिसांनी दुर्घटनेबाबत संबंधित केमिकल कंपनीला माहिती दिली. दोन हायड्रा मशीन्सच्या मदतीनं रस्त्यावर पलटी झालेला कंटनेर हटवण्यात आला होता.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.