Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला, जीव कासावीस; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले

7

Manmad Panewadi News : एक वर्षाच्या चिमुकल्याने विक्सची डबी गिळली. त्याला त्रास होऊ लागला. पालकांनी तात्काळ रुग्णालय गाठलं. त्यानंतर डॉक्टरांनी यशस्वीरित्या विक्सीची डबी बाहेर काढून चिमुकल्याला जीवदान दिलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
रईस शेख, मनमाड : खेळता खेळता एक वर्षीय चिमुकल्याने विक्सची छोटी डबी गिळल्याची घडना समोर आली आहे. विक्सची ही छोटी डबी चिमुकल्याच्या घशात अडकली. या अडकलेल्या डबीमुळे चिमुकल्याचा जीव गुदमरला होता. मात्र तोपर्यंत पालकांचं लक्ष गेल्याने पालकांनी त्याला तातडीने मनमाडमधील रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून घशात अडकेली डबी काढून चिमुकल्याचा जीव वाचवला.
Mumbai News : ५० डॉक्टरांची टीम, १० तास शस्त्रक्रिया; ‘केईएम’ रुग्णालयाने यशस्वी हृदयप्रत्यारोपण करत रचला इतिहास

विक्सीची डबी घशात अडकली

देव तारी त्याला कोण मारी… याचा प्रत्येय मनमाडच्या पानेवाडी येथील नागरिकांना आला. मनमाडच्या पानेवाडी येथील सागर काकड यांचा एक वर्षाचा मुलगा मल्हार हा विक्सची छोटी डबी हातात घेऊन खेळत होता. खेळताना अचानक त्याने ती डबी तोंडात टाकली. नंतर डबी त्याच्या घशात जाऊन अडकली. डबी घशात अडकल्यामुळे मल्हार तडफडू लागला. श्वास घेण्यात अडचण येत असल्याने चिमुकल्याचा जीव गुदमरत होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पालकांची धांदल उडाली. काय करावं त्यांना सुचेना. त्यांनी अडकलेली डबी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. अखेर त्यांनी या चिमुकल्याला घेऊन पालकांनी देवकी हॉस्पिटल गाठलं.
१००० च्या जागी १६००, तर ५०० रुपयावर निघाले ११००; एटीएमबाहेर नागपूरकरांची एकच गर्दी

बाळाची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली

विक्सीची डबी घशात अडकल्यामुळे या बाळाची ऑक्सिजन लेव्हल ३६ ते ३७ पर्यंत खाली घसरली होती. तसंच फुफ्फुसाला होणारा ऑक्सिजन मार्ग देखील काही प्रमाणात बंद झाला होता. अशा परिस्थितीत थोडा जरी विलंब झाला असता, तर दुर्दैवी घटना घडली असती. मात्र डॉ. राजपूत यांनी समय सूचकता दाखवत या चिमुकल्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून त्याला जीवदान दिलं. त्यामुळे मल्हार या चिमुकल्यासाठी डॉ. राजपूत देवदूतच ठरले असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला, जीव कासावीस; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले

डॉ. रवींद्र राजपूत, विजय राजपूत यांनी लरिंगोस्कोपचा वापर करत घशात अडकेली डबी बाहेर काढून मल्हारला जीवदान दिलं. आपला एकुलता एक मुलगा या वेदनेतून, संकटातून सुखरुप बाहेर पडल्याचं दाम्पत्याला समजल्यानंतर त्यांना रडू कोसळून. त्यांचा जीव भांड्यात पडला.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.