Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nitin Gadkari: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप दणकून आपटला. यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पक्षानं २१ जणांकडे विशेष जबाबदारी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर भाजपनं विधानसभेसाठी चार जणांकडे प्रचाराचं नेतृत्त्व दिलं आहे. नितीन गडकरींकडे विशेष प्रचारकपद देण्यात आलं आहे. ते महिनाभर राज्य पालथं घालतील. विविध भागांत जाऊन पक्षाचा प्रचार करतील. निवडणूक व्यवस्थापन समितीचे संयोजक प्रमुखपदी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची निवड करण्यात आली आहे. या दोघांशिवाय प्रचाराचं नेतृत्त्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे असेल. गडकरी, फडणवीस, दानवे, बावनकुळे या चार नेत्यांकडे भाजपनं महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
Haryana Assembly Election 2024: भाजप अडचणीत, अवघ्या २४ तासांत २० नेत्यांचे राजीनामे; आजी-माजी मंत्र्यांचा पक्षाला रामराम
भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. त्यात १७ जणांचा समावेश आहे. यातील काही जण काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आहेत. स्टार प्रचारकांच्या यादीत खासदार अशोक चव्हाण, खासदार नारायण राणे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन महाजन, रविंद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार पंकजा मुंडे, विजया रहाटकर, प्रविण दरेकर, भाई गिरकर, अशोक नेते, अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे.
Nitin Gadkari: विधानसभेसाठी भाजपचं मेगा प्लानिंग; २१ नेत्यांवर जबाबदारी, गडकरींकडे ‘विशेष’ कामगिरी
प्रचाराचं नेतृत्त्व चौघांकडे सोपवणाऱ्या भाजपनं स्टार प्रचारकांच्या यादीत १७ जणांना स्थान दिलं आहे. एकूण २१ नेत्यांवर भाजपनं विधानसभेसाठी मोठी जबाबदारी दिली आहे. लोकसभेला भाजपला सर्वाधिक फटका विदर्भ, मराठवाड्यात बसला. विदर्भातील लोकसभेच्या १० पैकी केवळ २ जागा भाजपला जिंकता आल्या. फडणवीस, गडकरी, बावनकुळे विदर्भातून येतात. तिथे विधानसभेच्या ६२ जागा येतात. त्यामुळे भाजपनं विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. विदर्भासाठी मध्य प्रदेशमधील ४ नेत्यांना सक्रिय करण्यात आलं आहे. लोकसभेला मध्य प्रदेशात भाजपला २९ पैकी २९ पैकी जागा मिळवून देणाऱ्या चार नेत्यांकडे भाजपनं विदर्भाची जबाबदारी दिली आहे.