Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Malad Building Slab Collpase: मालाड येथे एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या २० व्या मजल्याचा स्लॅब कोसळून मोठा दुर्घटना घडली. यामध्ये तीन श्रमिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
गोपाळ मोदी (३२), सोहन रोठा (२६), विनोद सदार (२६) अशी मृतांची नावे आहेत, तर जलिल शेख (४५), रूपसन ममिन (३०) आणि महंमद शेख (३०) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील जलील याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या २० व्या मजल्याचा स्लॅब कोसळला
गोविंद नगर येथील नवजीवन या २३ मजली ‘एसआरए’ इमारतीचे बांधकाम सुरू आहे. गुरुवारी दुपारी १२च्या सुमारास या इमारतीच्या २०व्या मजल्याचा स्लॅब कोसळला आणि इमारतीच्या तळमजल्यावर काम करत असलेले सहा श्रमिक स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले.
Times Tower Fire: टाइम्स टॉवरला भीषण आग, अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
मोठा आवाज, वाचवण्यासाठी श्रमिकांची याचना, ढिगाऱ्याखालून काढण्याचे प्रयत्न
खूप मोठा आवाज आल्याने आजूबाजूला असलेल्या इमारतींतील रहिवासी तसेच रस्त्यावरून जाणारे पादचारीही घाबरले. नेमके काय घडले हे अनेकांना समजले नाही. त्याचवेळी अडकलेले श्रमिक मदतीसाठी याचना करू लागल्याने अन्य श्रमिकांसह स्थानिक रहिवाशांनीही मदतीसाठी धाव घेतली आणि अडकलेल्या श्रमिकांना ढिगाऱ्याखालून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
Mumbai News: २० व्या मजल्यावरुन काळ कोसळला, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना पाहून नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या श्रमिकांना बाहेर काढलं
या घटनेची माहिती त्वरित पोलिस आणि अग्निशमन दलालाही देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या सहाही श्रमिकांना बाहेर काढण्यात आले. त्यांना मालाडमधील एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी गोपाळ मोदी, सोहन रोठा, विनोद सदार यांना मृत घोषित केले.
जलिलवर ऑर्थो वॉर्डमध्ये, तर रूपसान ममिनवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. मोहम्मद शेख याला पुढील उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. या घटनेची ‘एसआरए’कडून चौकशी केली जाणार आहे.