Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

हॉटेल मालकाने जेवण नाकारलं, पुण्यात मद्यधुंद कंटेनर चालकाचा थरार, कारसह हॉटेलचं नुकसान

6

Pune Indapur Truck Driver Video: पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरातील हिंगणगांव येथे रोडलगत असणाऱ्या हॉटेल गोकुळ येथे जेवण नाकारल्याच्या कारणातून एका मध्यपान केलेल्या कंटेनर चालकाने नशेत कंटेनर चालवत एका कारसह हॉटेलचे प्रचंड नुकसान केले आहे.

हायलाइट्स:

  • पुणे इंदापूरमध्ये मध्यधुंद कंटेनर चालकाचा थरार
  • नशेत कंनटेर चालवत केले कारसह हॉटेलचे मोठे नुकसान
  • हॉटेल गोकुळ येथे घडली घटना
Lipi
इंदापूर गोकुळ हॉटेल ट्रक व्हिडिओ
दीपक पडकर, पुणे : जेवण नाकारल्याने मध्यधुंद अवस्थेतील चालकाने मोठा राडा केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या इंदापूरमध्ये मध्यधुंद कंटेनर चालकाचा थरार पाहायला मिळाला आहे. पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरातील हिंगणगांव येथे रोडलगत असणाऱ्या हॉटेल गोकुळ येथे जेवण नाकारल्याच्या कारणातून एका मध्यपान केलेल्या कंटेनर चालकाने नशेत कंटेनर चालवत एका कारसह हॉटेलचे प्रचंड नुकसान केले आहे.सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने MH 12 RN 4359 क्रमांकाचा हा कंटेनर त्यावरील चालक घेऊन निघाला होता. दरम्यान हिंगणगाव येथील हॉटेल गोकुळवर चालकाने वाहन थांबवले आणि त्याने हॉटेलमध्ये जाऊन जेवण मागितलं. मात्र हॉटेल बंद असल्याचे सांगत त्याला जेवण नाकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तो नशा केलेल्या अवस्थेत होता अशीही माहिती मिळत आहे.

Aaditya Thackeray: महायुतीकडे CM पदासाठी कोणाचा चेहरा? ते तर योजनेच्या क्रेडिटवरुन भांडतात, आदित्य ठाकरेंकडून खिल्ली

पाय घसरला अन् सर्व काही संपले

दोन दिवसांपूर्वी मावळ तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली. कुंडमळा येथे फिरण्यासाठी आलेल्या सहा मुले आणि दोन मुलींपैकी एक मुलगा आणि एक मुलगी पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित मुले ही पर्यटनासाठी या भागात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस प्रशासन आणि रेस्क्यू टीमकडून या दोन तरुणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

ते वाहून गेल्याची घटना प्रत्यक्षदर्शनींनी पोलिसांना दिली. घटनास्थळी वन्यजीव आपदा संस्था मावळ तसेच तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते आणि या दोघांना शोधण्याचे काम तेव्हा सुरु होते. या घटनेमुळे सोबत आलेले मित्र-मैत्रिणी पूर्णतः घाबरलेल्या आहेत. घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.

या अगोदर देखील कुंडमळा धबधब्यामध्ये अनेक जण वाहून गेले आहेत. त्यात त्यांचा मृत्यू देखील झाला आहे. मात्र ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या भागात शोधकार्य झपाट्याने सुरू असून पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.