Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दोन भरधाव बस समोरासमोर धडकल्या, वाहनांचं बोनेट फुटलं, भीषण अपघातात २५ जण जखमी

10

Raigad Bus Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणेजवळ दोन बसची एकमेकांना धडक लागून भीषण अपघात झाला. या अपघातात २५ जण जखमी झाले. तर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Raigad Bus Accident : दोन भरधाव बस समोरासमोर धडकल्या, वाहनांचं बोनेट फुटलं, भीषण अपघातात २५ जण जखमी

अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणेजवळ दोन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात पंचवीस जण जखमी झाले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील चाकरमान्यांनी गेल्या चार दिवसंपासून कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्यास सुरूवात केली. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई येथून रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे जाण्यासाठी निघणारी बस आणि माणगावकडून मुंबईकडे जाणारी बस नागोठणे परिसरात एकेमकांवर समोरासमोर आदळल्याने भीषण अपघात झाला.

अपघातात सुमारे पंचवीस प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असल्याने त्याचा फटका मुंबई येथून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना बसला. दुसरीकडे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे. महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करत प्रवास करावा लागत आहे.
Nandurbar News : गळकं छत, डोक्यावर छत्री; गणेशोत्सवात भक्तांसाठी एसटी बस सोडल्या, पण…; प्रवाशांना मनस्ताप
गणेशोत्सवासाठी चाकरमानी दरवर्षी मुंबईतून कोकणात जातात. यावर्षी तरी गणेशभक्तांचा प्रवास कोणत्याही विघ्नाशिवाय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्याला खो देत मुंबई – गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी बघायला मिळाली. गेली कित्येक वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडलेलं आहे. आता या महामार्गाचं काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्ष लागतील, असं सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुढची दोन वर्षे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. दरवर्षीच या महामार्गावर गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.
कानात इअरफोन घालून रेल्वे ट्रॅक क्रॉस करण जीवावर बेतलं, ट्रेनच्या धडकेत पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातून पाच हजारपेक्षा जास्त एसटीच्या बसेस कोकणाकडे पाठवण्यात आल्या. या शिवाय हजारो खासगी वाहनं कोकणाच्या दिशेने निघाली आहेत. यामुळे महामार्गावरील वाहनांची संख्या खूप वाढली. परिणामी वाहतूक कोंडी निर्माण झाली. शुक्रवारी महामार्गावरील दोन्ही मार्गिकांवर वाहनांच्या सात ते आठ किलोमीटर लांब रांगा होत्या. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना आपलं गाव गाठण्यास उशीर होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय शोधण्याची गरज आहे. तसंच या महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.