Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विधानसभा निवडणुकीत भाजप समोरचे सर्वात मोठे आव्हान; स्वबळावर लढलो तर बंपर फायदा अन् महायुतीत पाहा काय होणार

8

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षांमध्ये सुरू आहे. मात्र या जागावाटपात सर्वात मोठे आव्हान भाजपसमोर असणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई: देशात सध्या हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. हरियाणात भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर अनेकांनी राजीनामे दिले. जे हरियाणात झाले ते थोड्या दिवसांनी महाराष्ट्रात होऊ शकते. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा असून यावेळी भाजपला जास्ती जास्त जागेवर निवडणूक लढवायची आहे. मात्र जागावाटपाच्या वेळी भाजपला एक नव्हे तर दोन पक्षांसोबत बोलणी करावी लागणार आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. या शिवाय महायुतीत काही छोटे पक्ष आहेत. आता भाजप स्वत:च्या जागा कमी न करता या दोन पक्षांसोबत कशी बोलणी करते हे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्रातील गेल्या दोन विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर २०१४ साली भाजपने २६० जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यांना १२२ जागा मिळाल्या होत्या. तर २०१९ साली १६४ जागांवर निवडणूक लढवून त्यांना १०५ जागा मिळाल्या होत्या. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे याबाबत कोणाचेही दुमत नाही. राज्यातील २४० जागांवर भाजपची स्थिती चांगली आहे. हीच पक्षाची ताकद आहे. पण २०२४च्या निवडणुकीत पक्षासमोर आव्हान वेगळे आहे. गेल्या म्हणजे २०१९च्या निवडणुकीत भाजपने ज्या जागा जिंकल्या आणि ज्या जागांवर ते दुसऱ्या क्रमांकावर होते त्या जागा स्वत:कडे ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. कारण या ठिकाणी पक्षाचे उमेदवार तिकीट मिळेल या आशेवर असतील.
Kolkata Doctor Case: आम्ही आरोपीची सुटका करू का? CBIच्या बेजबाबदारपणावर न्यायालय संतप्त

महायुतीच्या जागावाटपात भाजप जर १६४च्या खाली आले तर त्यांच्या अडचणी वाढतील. ज्या भाजप नेत्यांना तिकीट मिळणार नाही त्यांच्या समोर महायुतीच्या उमेदवाराला स्विकारणे किंवा अन्य पक्षाकडून निवडणूक लढवणे असे दोन पर्याय असतील.
Ajit Pawar NCP: मंत्रिमंडळ बैठकीत वादंगानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून पदाधिकाऱ्यांना तंबी, पाहा काय सांगितले

२०१९ साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने १२४ जागांवर निवडणूक लढवली आणि त्यांना फक्त ५६ जागा मिळाल्या. आता यावेळी भाजपवर शिंदे आणि अजित पवार यांना पुरेशा जागा देण्याचा दबाव असेल. या शिवाय काही छोटे पक्ष आहे ज्यांच्यासाठी जागा सोडावी लागेल, ज्यात रवी राणा, महादेव जानकर, आरएसपी सारख्या पक्षांचा समावेश होतो. २०१९ च्या निवडणुकीत २३ जागांवर भाजपचा ८ हजारपेक्षा कमी मतांनी पराभव झाला होता. या जागांचा विचार केला तर भाजपची १२८ जागांवर दमदार कामगिरी झाली होती. आता यापैकी किती जागा ते यावेळी स्वत:कडे राखतात हे पाहावे लागले.
सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरेंना एकही फोटो काढू दिला नाही- फडणवीसांचा दावा; CMपदावरून काढला चिमटा

२०१९च्या निवडणुकीत ५ हजार पेक्षा कमी मतांनी झालेला पराभव

राष्ट्रवादी काँग्रेस- ०९ जागा
शिवसेना- ०४ जागा
काँग्रेस- ०४ जागा
भाजप- १४ जागा

विधानसभा निवडणुकीत भाजप समोरचे सर्वात मोठे आव्हान; स्वबळावर लढलो तर बंपर फायदा अन् महायुतीत पाहा काय होणार

यावेळी भाजपने १४० जागांवर निवडणू्क लढवली तर २० मतदारसंघात भाजपचे नेते पक्ष सोडू शकतात. कारण या ठिकाणी संबंधित उमेदवार पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर होते. २०१४ तुलना केली तर ही संख्या ४२वर जाईल. भाजपला स्वत:चे उमेदवार आणि नेत्यांची नाराजी आणि बंडखोरी रोखण्याचे आव्हान असेल.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.