Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ajit pawar vs sharad pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी शरद पवारांना सोडून चूक केली. म्हणत आपल्या चुकीची कबुली दिली आहे. गडचिरोलीत जन सन्मान यात्रेनिमित्त आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. या निर्णयाचे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी स्वागत केलं आहे. तसेच दोन्ही शिवसेनेंबाबत भविष्यवाणी देखील केली आहे.
अजित पवारांच्या विचारांचे मी स्वागत करेन
रामदास कदम म्हणाले की, ” शेवटी काही झालं तरी ही रक्ताची नाती असतात. राजकारणात गेल्यानंतर 100 टक्के वैमानस्य आणायचे हे चुकीचे असते. नाती सांभाळून सुद्धा राजकारण करता येते. आणि हा महाराष्ट्र आहे बिहार नाही. अजित पवारांच्या विचारांचे मी स्वागत करेन.”
Amol Mitkari : पुढच्या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे, अमोल मिटकरींचं बाप्पाला साकडं
जोपर्यंत उद्धव ठाकरे कॉंग्रेससोबत तोपर्यंत शिवसेना एकत्र येणार नाही
अजित पवारांच्या या विधानावरून रामदास कदम यांनी दोन्ही शिवसेनेबाबत भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, जोपर्यंत उद्धव ठाकरे कॉंग्रेससोबत तोपर्यंत शिवसेना एकत्र येणार नाही. हे मी याआधीच म्हणालो होतो. परंतु आता पुलखालून एवढं पाणी गेलं आहे की दोन्ही शिवसेना एकत्र येणं शक्य नाही”.
अजित पवार काय म्हणाले होते?
मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या मुद्द्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, ” वडिलांचं जितकं लेकीवर प्रेम असतं तितकं प्रेम कुणीच करू शकत नाही. असं असताना तुम्ही जर घरात फुट पाडण्याचा प्रयत्न करत असाल तर हे बरोबर नाही. समाजाला सुद्धा ते आवडत नाही. याचा अनुभव आम्ही पण घेतलेला आहे. तसेच झालेली चूक सुद्धा मी मान्य केली आहे”. अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, भाजप वगळता अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक फटका बसला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने समाधानकारक यश मिळवलं आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याचा या तिन्ही पक्षाचा प्रयत्न राहणार आहे.