Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लांजा-राजापूरसाठी किरण सामंत ॲक्शन मोडवर, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या जागेवर काँग्रेसचा दावा

11

Lanja Rajapur Vidhan Sabha Election : लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये चूरस असून कोण दावा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे किरण सामंत यांच्या नावाची चर्चा असून राजन साळवी यांच्या जागेवर अविनाश लाड यांनी दावा केला आहे.

लांजा-राजापूरसाठी किरण सामंत ॲक्शन मोडवर, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या जागेवर काँग्रेसचा दावा

प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात सध्या गणेशोत्सवानिमित्त घराघरात उत्साह, आनंद आहे. अशातच राजकीय मंडळींनी देखील याच गणेशोत्सवाचा औचित्य साधून विविध उपक्रम गाठीभेटी सुरू केल्या आहेत. विधानसभा निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. जिल्ह्यात गुहागरसह सध्या लक्षवेधी ठरला आहे तो राजापूर विधानसभा मतदारसंघ. राजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू आणि रत्नसिंधू योजनेचे सदस्य असलेले किरण उर्फ भैय्या सामंत यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून भैय्या सामंत यांना तयारीला लागण्याचे आदेशही देण्यात आल्याचीही सध्या रंगली आहे. लांजा राजापूर येथील विकास कामांसाठी किरण सामंत ॲक्शन मोडवर आहेत.

अशातच भाजपने या मतदारसंघावरती दावा केला असला, तरी शिवसेनेकडून संघटनात्मक पातळीवर असंख्य पक्षप्रवेश कार्यक्रम भेटीसाठी यांचा धूमधडाका किरण सामंत यांनी सुरू केला आहे. भाजपाच्या दाव्याने महायुतीमधील अस्वस्थता समोर आली असतानाच आता महाविकास आघाडीतही ठाकरे गटाचे विद्यमान आमदार राजन साळवी यांच्याबाबत काँग्रेसने उघडपणे नाराजी व्यक्त करत या मतदारसंघावर दावा केला आहे.
अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकर यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल; थ्रोट इन्फेक्शनसह किडनीवरही परिणाम

राजापूर विधानसभा मतदारसंघातून राजन साळवी ३ वेळा विजयी

राजापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन साळवी हे याच मतदारसंघातून तब्बल तीन वेळा निवडून आले आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचा त्यांनी निसटता पराभव करून राजन साळवी पुन्हा एकदा निवडून आले.

काँग्रेसच्या अविनाश लाड यांचा राजापूर मतदारसंघावर दावा

मात्र यावेळी महाविकासआघाडी मधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी राजापूर विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसला मिळावा यासाठी उघडपणे दावा केला आहे. इतकंच नाही तर अवघ्या महाराष्ट्रात, देशात चर्चेचा विषय ठरलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या विषयात येथील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आमदार राजन साळवी यांच्या बदलत्या भूमिकेवर भाष्य करत जाहीरपणे टीका केली केली आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान आमदार म्हणून ओळखले जातात मात्र काँग्रेसकडून राजापूरवर प्रबळ दावा करण्यात आल्याने उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागल आहे.
राजकारण करायचे असेल तर थेट राजकारणात उतरावं, आरक्षणाच्या आड राहून राजकारण नको; जरांगेंना आमदाराचा सल्ला

राजापूर लांजा मतदारसंघासाठी भैय्या सामंतांचं नाव चर्चेत

लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण उर्फ भैय्या सामंत यांचे नाव महायुतीकडून चर्चेत होतं. मात्र महायुती मधील नेत्यांनी सस्पेन्स वाढवत निवडणुकीच्या काही दिवस आधीच राणे यांचे नाव जाहीर केलं आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली आणि राणे खासदार झाले. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीला फटका बसला असून ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात क्रमांक एकची मतं मिळाली. यामुळेच भाजपच्या विजयानंतर शिवसेना भाजपा मधील शीतयुद्ध आता समोर आला आहे. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये किरण उर्फ भैय्या सामंत यांना आता राजापूर लांजा मतदारसंघासाठी तयारीला लागण्याचे आदेश शिवसेनेच्या नेत्यांकडून देण्यात आल्याची चर्चा आहे.

उमेदवारी दिल्यास नक्की निवडणूक लढवेन – भैय्या सामंत

राजापूर येथील दहीहंडी कार्यक्रमात मंत्री उदय सामंत यांनीही पुढच्या वर्षीची राजापूर येथील दहीहंडी हे किरण उर्फ भैया सामंत फोडतील असं सांगत सुचक विधानही केलं होतं. किरण सामंत यांनीही गेली अनेक महिने राजापूर लांजा येथे दौरे करून येथील अनेक प्रश्न समजून घेत अनेक विकासकामांचा धूम धडाका लावला आहे. काही पूल, लघु पाटबंधारेचे प्रकल्प, रस्ते, मोबाईल टॉवर यासारखे अनेक विकासाची कामे मंजूर केले आहेत.

लांजा-राजापूरसाठी किरण सामंत ॲक्शन मोडवर, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या जागेवर काँग्रेसचा दावा

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हास्तरीय पदाधिकारी काही सरपंच माजी नगरसेवक यांनाही सामंत शिवसेनेत प्रवेश देऊन संघटनात्मक पातळीवर मोठी तयारी केली आहे. इतकच नाही तर संघटनेच्या कामात अपूर्वा किरण सामंत याही सक्रिय आहेत. महायुतीचा जो उमेदवार असेल तो येथे निवडून येईल महायुतीने मला उमेदवारी दिल्यास मी नक्की येथून नक्की निवडणूक लढवेन, निवडून येईल असा आत्मविश्वास भैय्या सामंत यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. किरण सामंत यांच्या हे उदय सामंत यांच्या आजवरच्या पाचवेळा झालेल्या विजयातील किंगमेकर ओळखले जातात. त्यांच्याकडे प्रत्येक काम हे तात्काळ मार्गी लावण्याची असलेली हातोटी, शांत आणि संयमी स्वभाव या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र या मतदारसंघात भाजपाची भूमिकाही महायुतीसाठी महत्वाची आणि निर्णायक ठरणार आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.